शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज्यातून १ कोटी सह्या घेणार, काँग्रेसचा महिला विरोधी चेहरा उघड करू”: CM देवेंद्र फडणवीस
2
“२ लाख ७० हजाराचा रेकॉर्ड मोडायचा, बारामती निवडणूक बिनविरोध व्हायला हवी होती पण…”: पार्थ पवार
3
कियाने पुन्हा लाँच केली न खपणारी कार, गेल्या महिन्यात ५९ पण विकल्या नव्हत्या, ५०० चा आकडा गाठतानाही...
4
जम्मू-काश्मीरच्या उधमपूरमध्ये बसचा भीषण अपघात; १५ जणांचा मृत्यू, अनेक प्रवासी गंभीर जखमी
5
Latest Marathi News LIVE Updates: विरोधकांनी महिला आरक्षण विधेयकाची भ्रूणहत्या केली, फडणवीसांचा घणाघात
6
Ashok Kharat : "...तर नागदेवता तुझ्या मुलास दंश करेल"; भोंदू अशोक खरातने महिलेला दाखवलेली भीती
7
लेकीला कडेवर घेऊन पाऊण तास उभा, १०० रिक्षांना हात दाखवला तरीही...; डोंबिवलीतील व्हिडीओ व्हायरल
8
हैवान! पित्याने आपल्या ७ मुलांना झोपेतच संपवलं, चार मुलं स्वत:च्या पत्नीपासून तर तीन मुलं...
9
“तुम्ही ७५ काय, १७५ वर्षे आरक्षण घ्या, आम्हाला गरज नाही”; बृजभूषण शरण सिंह यांचा रोख कुणाकडे?
10
मध्यस्थीच्या नावाखाली ‘वसुली’ करण्याचा पाकचा मोठा डाव; पूर्वीही दोनदा असेच खिसे भरून घेतलेत!
11
Chanakya Niti: आचार्य चाणक्य म्हणतात, 'या' मानसिकतेमुळे लक्ष्मी पाठ फिरवते! तुम्ही तर ही चूक करत नाही ना?
12
Mamata Banerjee : "नाव, पत्ता सगळं माहित आहे, हिशोब तर होणारच!"; ममता बॅनर्जींची अधिकाऱ्यांना थेट धमकी
13
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खानने ११ एप्रिलला घेतले मुंब्र्यात उपचार; जामीन अर्जावर आज सुनावणी
14
369 हा एक आकडा नाही, ब्रह्मांडाची ताकद आहे; मनात आणाल, पूर्ण होईल, २१ दिवसांत संकेत मिळतील!
15
MSRTC: एसटी आगार, परिसर स्वच्छतेचा करोडोंचा खर्च प्रवाशांच्या माथी
16
Avinash Bhosale: बिल्डर अविनाश भोसले यांना दिलासा; मालमत्तांवरील कारवाई रद्द
17
अतिवृष्टीचा इशारा; पिके चांगली पण रोगराई, नासाडीची भीती; भेंडवळ घटमांडणीचे यंदाचे भाकीत
18
आयआयटीच्या नावाखाली कोट्यवधींची फसवणूक, राज्यातील शैक्षणिक संस्थांना सावधानीचा इशारा
19
सोन्याचे दर ₹१,५०० हून अधिकने कोसळले; तर चांदीही ₹५,००० ने स्वस्त; पुढे काय..?
20
अमेरिका-इराणमधील तणाव पुन्हा वाढला! 'होर्मुझ'च्या वादामुळे अचानक कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ
Daily Top 2Weekly Top 5

बीट मार्शलच्या सतर्कतेमुळे चारचाकीची आग आटोक्यात

By admin | Updated: March 22, 2015 23:54 IST

मुरारीनगरमधील घटना : मोठा अनर्थ टळला

सिडको : सोसायटीच्या वाहनतळात उभ्या असलेल्या चारचाकीला अज्ञात समाजकंटकांनी लावलेली आग पोलीस बिट मार्शलच्या सतर्कतेमुळे तत्काळ लक्षात आली़ स्थानिक नागरिकांच्या सहकार्याने ही आग विझविल्याने मोठा अनर्थ टळला़ शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास सिडकोतील मुरारीनगरमध्ये ही घटना घडली़याबाबत अधिक माहिती अशी की, सिडको परिसरातील मुरारीनगरमध्ये असलेल्या गजानन पार्क या सोसायटीत नितीन सोनवणे राहतात़ शनिवारी (दि़२१) नेहमीप्रमाणे त्यांनी आपली सॅन्ट्रो कार (एमएच १५, बीएक्स १२८८) सोसायटीच्या वाहनतळात लावलेली होती़ मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात समाजकंटकांनी त्यांच्या कारला आग लावून जाळण्याचा प्रयत्न केला़ अंबड पोलीस ठाण्याचे बीट मार्शल मोहन संगमनेरे हे या परिसरात गस्त घालीत असताना त्यांना सोसायटीच्या आवारातील कारला आग लागल्याचे दिसले़यानंतर संगमनेरे यांनी त्वरित सोसायटीतील रहिवाशांना उठवून या गाडीवर पाणी टाकून आग विझविल्याने मोठा अनर्थ टळला़ दरम्यान, या घटनेची माहिती कळताच अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिनेश बर्ढेकर हे कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचले व आग लावणाऱ्या व्यक्तीचा शोध लावला़ सिन्नर तालुक्यातील निमगाव येथील रहिवासी संशयित बाळू चंद्रमोरे याने अंतर्गत वादातून हा प्रकार केल्याचे पोलीस तपासात समोर आले असून, त्याच्यावर अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ (वार्ताहर)