शहरं
Join us  
Trending Stories
1
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
2
कैसे बोगस दाखला बनाया? एमआयएम नगरसेविका सहर शेखकडून शासकीय यंत्रणांची दिशाभूल
3
नाशिकच्या तरुणींना मलेशियात विकण्याचा कट? आयटी कंपनीतील 'त्या' प्रकरणाला मानवी तस्करीचे भयानक वळण
4
Mumbai Traffic Update: बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
5
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
6
IPL 2026: आधीच KKRची एक सामना जिंकायची मारामार, त्यात अजिंक्य रहाणेला BCCIचा मोठा दणका
7
सुपर डुपर हिट... ‘वंदे भारत’ची कमाल कामगिरी, ९ कोटी प्रवाशांचा प्रवास; २७४ जिल्हे, १६४ सेवा!
8
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
9
Share Market: शेअर बाजारात तुफान तेजी! सेंसेक्समध्ये १२०० अंकांची उसळी; निफ्टी २४,२०० च्या वर; 'या' शेअर्समध्ये जोरदार रॅली
10
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
11
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
12
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
13
भन्साळींच्या 'रोमँटिक' प्रोजेक्टसाठी शाहरुखचा 'ग्रीन सिग्नल'? वयानुसार भूमिका करणार किंग खान
14
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
15
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
16
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
17
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
18
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
19
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
20
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
Daily Top 2Weekly Top 5

‘दूधसागर’ धबधबा खळाळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2017 00:19 IST

नाशिक :निसर्गरम्य वातावरणात कणीस अन् भजींचा आस्वाद घेत नाशिककरांनी मोठ्या संख्येने सोमेश्वरजवळील धबधब्याच्या परिसरात रविवारचा मनमुराद आनंद लुटला.

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : पावसाची संततधार...सुटलेला थंडगार वारा... दुथडी भरून वाहणारी गोदामाई... डोळ्यांची पारणे फेडणारा अन् जणू नायगाराची प्रतिकृती भासणारा खळाळलेल्या दूधसागर धबधब्याचे दृश्य कॅमेऱ्यात टिपले तसेच निसर्गरम्य वातावरणात कणीस अन् भजींचा आस्वाद घेत नाशिककरांनी मोठ्या संख्येने सोमेश्वरजवळील धबधब्याच्या परिसरात रविवारचा मनमुराद आनंद लुटला. सोमेश्वरजवळील नाशिककरांच्या पसंतीच्या दूधसागर धबधब्याचे रविवारचे रुपडे बघून नाशिककरांनी एकच जल्लोष केला. ग्रुप फोटो, सेल्फी अन् व्हिडीओद्वारे खळाळून वाहणारा आवडीचा दूधसागर धबधबा अनेकांनी टिपला. शहरापासून अत्यंत जवळ असलेल्या या आवडीच्या धबधब्याचे सौंदर्य नाशिककरांनी आपल्यापुरतेच मर्यादित ठेवले असे नाही तर क्षणार्धात आधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ घेत सोशल मीडियाच्या माध्यमातून ओसंडून वाहणारा दूधसागर धबधबा व्हॉट्सअ‍ॅप व फेसबुकवर ‘पोस्ट’ केला. काही युवक-युवतींनी धबधब्यासोबत ‘सेल्फी’ तर काढल्याच; मात्र थेट फे सबुकवर लाइव्ह ‘सेल्फी व्हिडीओ’ आपल्या यादीतील लोकांना ‘टॅग’ केला. गंगापूर धरणातून शनिवारपासून हजारो क्यूसेक पाणी गोदापात्रात सोडले जात आहे. यामुळे सोमेश्वर मंदिरापुढे असलेला दूधसागर धबधबा मागील काही दिवसांपासून खळाळून वाहत आहे. या धबधब्याचे पावसाळ्यातील रूप अन्य दिवसांपेक्षा जरा वेगळेच असते.  गंगापूर गावालगत गोदेच्या खडकाळ पात्रातील हे पाणी पंधरा ते वीस मीटर उंचीवरून खाली कोसळते यामुळे या ठिकाणी दूधसागर धबधबा तयार झालेला दिसून येतो. स्थानिकांना रोजगारविकेण्ड आणि गंगापूर धरणातून सातत्याने होत असलेला विसर्ग यामुळे दूधसागर धबधब्याच्या परिसरात नागरिकांची वर्दळ वाढल्याने स्थानिक लोकांना रोजगार मिळाला आहे. पावसाच्या सरी अंगावर झेलत नागरिक मका कणीस, भजी, चहाला पसंती देत असल्यामुळे गोदावरी परिचय उद्यानाच्या कोपऱ्यावरून पुढे मोठ्या संख्येने गंगापूर गावातील रहिवाशांनी दुकाने थाटली आहेत.