शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
3
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
4
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
5
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
6
तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत? तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली
7
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
8
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
9
नागपूर विमानतळ उडविण्याची धमकी; ई-मेलनंतर प्रशासन अलर्ट मोडवर; सुरक्षा व्यवस्थेत वाढ
10
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
11
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
12
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत
14
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
15
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
16
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
17
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
18
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
19
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
20
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?

द्राक्षपंढरीला दुष्काळाचा डंख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 06, 2018 5:51 PM

सायखेडा : यंदाच्या वर्षाला म्हणावा तसा पाऊस बरसलाच नसल्याने जिल्हा भरात दुष्काळचे सावट पसरलेले आहे. अशात आहे ती पिके वाचवण्यासाठी शेतकरी धडपड करत असतांना विविध उपाय योजना करत असतांना पाणी बचतीसाठी ऊसाचे पाचट संजीवनी ठरत आहे.

ठळक मुद्देपाणी टंचाईवर जिल्ह्यात निफाडच्या पाचटाला मागणी

सायखेडा : यंदाच्या वर्षाला म्हणावा तसा पाऊस बरसलाच नसल्याने जिल्हा भरात दुष्काळचे सावट पसरलेले आहे. अशात आहे ती पिके वाचवण्यासाठी शेतकरी धडपड करत असतांना विविध उपाय योजना करत असतांना पाणी बचतीसाठी ऊसाचे पाचट संजीवनी ठरत आहे.सधनतेचा डंका वाजवणाऱ्या निफाड तालुक्याला दुष्काळी परीस्थितीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे तालुक्याचे प्रमुख पिक असणाºया द्राक्ष बागांना याची झळ बसत असल्यामुळे जवळपास बावीस हजार हेक्टरहुन आधिक क्षेत्रात अता पाणी टंचाई वर प्रभावी उपाय म्हणुन ऊसाचे पाचट ठरले आहे. त्यामुळे निफाडच्या ऊसाच्या पाचटांच्या गाठीना जिल्हाभरातुन मागणी वाढली आहे.निफाड तालुक्यात गोदावरी कादवा बाणगंगा सह नांदुरमध्यमेश्वर धरण, कालवे यामुळे बागायती क्षेत्र वाढले. परंतु वाढती लोकसंख्या आणि पाण्याच्या श्रोतांवर येणारा ताण यामुळे दरवर्षी दुष्काळ परीस्थिती निर्माण होवु लागली आहे.या परीस्थीतीत तालुक्याच्या सर्वच भागात असणाºया द्राक्षशेतीला याची धग बसु लागली आहे. परीणामी मोठ्या कष्टाने उभ्या केलेल्या बागांना वाचविण्यासाठी शेतकरी टॅँकरने पाणी विकत घेवुन पिक जगवण्याचा प्रयत्न करत आहे. द्राक्षबरोबरच तालुक्यात ऊसाचे क्षेत्र मोठे असल्याने टंचाई काळात उस द्राक्षबागांसाठी वरदान ठरत आहे. सध्या तालुक्यातील ऊसाच हंगाम भरात आला आहे. या ऊसाच्या फडातील शिल्लक राहिलेले पाचटाच्या मशिनच्या साह्याने गाठी तयार करुन त्या द्राक्षबागांसाठी पुरवली जात आहे. हे पाचट द्राक्षबागांच्या गल्यात टाकल्यामुळे एकरात लाखो लीटर पाण्याची बचत होवु लागल्यामुळे नाशिक, दिंडोरी, चांदवड, वणी, येवला, सिन्नर, कोपरगाव, कसमा पट्टा तसेच द्राक्षपंढरीतील गावांत पाणी बचतीसाठी ऊसाचे पाचट वापरले जावु लागले आहेत. ऊसाचे रान खाली झाल्यावर पाचटांच्या गाठी तयार केल्या जात आहे. एक गाठ साधरण स्थानिक तीस तर बाहेर अंतरानुसार साठ रुपयांपर्यत मिळते. त्यागाठीत जवळपास द्राक्षबागेतील पाचते सहा झाडे होतात त्यामुळे जिल्हाभरातील शेतकरी आपल्या बागांत पाचट टाकण्याचा कल वाढला आहे.फायदे१) द्राक्षबागांना मोठ्या प्रमाणात पाण्याची बचत.२) द्राक्षांच्या मुळ्यांची वाढ होते.३) जमीनीचा पोत राखला जातो.४) जमिन भुसभुशीत होते.५) शेतातत सेंद्रीय कर्बाचे प्रमाण वाढते.६) ऐकरात २५० ते तीनशे गाठी.७) ऐक आयशरमध्ये २५० गाठी.८) उस उत्पादक शेतकर्यांना चार रु पये गाठ.९) स्थानिक द्राक्षबागायता दारांना तीस रु पये.१०) बाहेरील शेतकºयांसाठी ५५ ते ६० रु पये गाठ.चौकटतालुक्यात यंदा अपेक्षीत पाऊस बरसला नाही आॅक्टोबर महिन्यापासुनच पाणी टंचाईचा फटका बसु लागल्यामुळे शेतकरी आता ऊसाच्या पाचटापासुन मल्चींग करत आपल्या बागांना पाणी देत आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याची बचत होवुन त्यावर मात होत आहे.- शहाजी राजोळे,द्राक्षउत्पादक शेतकरी.