ट्रकच्या धडकेने कारचालक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2020 12:23 AM2020-03-10T00:23:05+5:302020-03-10T00:25:46+5:30

चांदवड : तालुक्यातील तांगडी फाट्याजवळ देवळ्याकडून चांदवडकडे येणारी अल्टो कार व मालट्रक यांची समोरासमोर धडक झाल्याने अल्टो कारचालक जागीच ठार झाला.

The driver of the truck was killed | ट्रकच्या धडकेने कारचालक ठार

चांदवड-देवळा रोडवरील तांगडी फाट्याजवळ याच ट्रकला ओव्हरटेक करताना अपघात झाला.

googlenewsNext
ठळक मुद्देअल्टो कार व मालट्रक यांची समोरासमोर धडक

चांदवड : तालुक्यातील तांगडी फाट्याजवळ देवळ्याकडून चांदवडकडे येणारी अल्टो कार व मालट्रक यांची समोरासमोर धडक झाल्याने अल्टो कारचालक जागीच ठार झाला.
या अपघातात ठार झालेला तरुण शेखर गणपत कोतवाल (३३)रा. चांदवड याचे निधनाचे वृत्त चांदवड येथेच चांदवड उपजिल्हा रुग्णालयात नातलंग व मित्र परिवाराने प्रचंड गर्दी केली होती. मनमिळाऊ व सर्वाचा परिचित शेखर कोतवाल यांचे निधनाचे वृत्त समजताच हळहळ व्यक्त होत आहे. चांदवड देवळा रोडवर सोमवार दि. ९ मार्च रोजी दुपारी पावने दोन वाजेच्या सुमारास चांदवडकडून देवळ्याकडे जाणारी मालट्रक (क्र. टीएन २९ बीएस ६०८०) व देवळ्याकडून चांदवडकडे येणारी अल्टो कार (क्र. एमएच १५ सीएम ०५७३) यांची समोरासमोर धडक झाल्याने अल्टो कार ट्रकखाली सापडून त्यात शेखर गणपत कोतवाल ( ३३) रा. चांदवड हा जागीच ठार झाला. अपघाताचे वृत्त समजताच वडनेरभैरव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गुरव, पोलीस उपनिरीक्षक कैलाससिंग पाटील, हवालदार रमेश आवारे , कॉ.अनिल गांगुर्डे व पोलीस कर्मचारी घटनास्थळी गेले त्यांनी मृतास चांदवड उपजिल्हा रुग्णालयात आणले. पोलीसानंी अपघाताचा गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलीस करीत आहेत.

Web Title: The driver of the truck was killed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.