दुचाकीवरील ताबा सुटल्याने चालक ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2021 23:21 IST2021-10-27T23:18:51+5:302021-10-27T23:21:05+5:30
त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हरसूल भागातील ओझरखेड ठाणापाडा रस्त्यावर सोमवारी (दि. २५) रात्री साडेआठच्या सुमारास ओझरखेडवरून ठाणापाडा येथे दुचाकी (एमएच १५ डीजी ९३७०) वर दीपक काशिनाथ मौळे (वय २९, रा. भूतमोखाडा) हा भरधाव वेगात जात असताना बोरीपाडा शिवारातील काळू बोरसे यांच्या शेतासमोरील वळणावर त्याचा गाडीवरील ताबा सुटला. यावेळी झालेल्या अपघातात त्याच्या डोक्यास गंभीर मार लागून तो जागीच ठार झाला.

दुचाकीवरील ताबा सुटल्याने चालक ठार
त्र्यंबकेश्वर : तालुक्यातील हरसूल भागातील ओझरखेड ठाणापाडा रस्त्यावर सोमवारी (दि. २५) रात्री साडेआठच्या सुमारास ओझरखेडवरून ठाणापाडा येथे दुचाकी (एमएच १५ डीजी ९३७०) वर दीपक काशिनाथ मौळे (वय २९, रा. भूतमोखाडा) हा भरधाव वेगात जात असताना बोरीपाडा शिवारातील काळू बोरसे यांच्या शेतासमोरील वळणावर त्याचा गाडीवरील ताबा सुटला. यावेळी झालेल्या अपघातात त्याच्या डोक्यास गंभीर मार लागून तो जागीच ठार झाला. तर, दुचाकीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
याबाबतची फिर्याद अशोक काळू बोरसे रा. कोटंबी यांनी हरसूल पोलीस ठाण्यात दिली आहे. घटनास्थळी सहायक पोलीस निरीक्षक गणेश वारुळे यांनी भेट दिली. याबाबत पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक गणेश वारुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार पलुस्कर करीत आहेत.