बोकडदऱ्यात वाहनचालकाचा मृतदेह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2018 01:16 IST2018-04-05T01:16:55+5:302018-04-05T01:16:55+5:30

तालुक्यातील बोकडदरे गावाजवळ नाशिक-औरंगाबाद रोडलगत मारुती ओम्नी गाडीचालकाचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत आढळून आल्याची घटना घडली आहे,

The driver of the carriage in bulk | बोकडदऱ्यात वाहनचालकाचा मृतदेह

बोकडदऱ्यात वाहनचालकाचा मृतदेह

निफाड : तालुक्यातील बोकडदरे गावाजवळ नाशिक-औरंगाबाद रोडलगत मारुती ओम्नी गाडीचालकाचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत आढळून आल्याची घटना घडली आहे,  निफाड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दि.४ एप्रिल रोजी सकाळच्या दरम्यान नागरिकांना बोकडदरे गावाजवळ नाशिक-औरंगाबाद रोडच्या कडेला मारुती ओम्नी गाडी (एमएच १५ बीडब्ल्यू ५८६६) हे वाहन तिरप्या स्थितीत उभे असलेले व तिच्या शेजारी काही फुटांच्या अंतरावर जळालेल्या अवस्थेतील पुरुषाचा मृतदेह पडलेला असल्याचे दिसले. ही घटना पाहिलेल्या नागरिकांनी निफाड पोलीस ठाण्याला या घटनेची माहिती दिली. त्यानंतर निफाडचे पोलीस उपअधीक्षक दीपक गिºहे, निफाडचे पोलीस निरीक्षक रणजित डेरे व पोलिसांचे पथक तातडीने बोकडदरे येथे घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी सदर जळालेल्या मृतदेह निफाड उपजिल्हा रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी आणला. निफाड पोलिसांनी अधिक तपास केला असता हा मृतदेह ओझर येथील चंपालाल वाल्मीक जाट (४६) रा. श्रमिकनगर ओझर, ता. निफाड यांचा असल्याचे स्पष्ट झाले. मयत जाट यांचे नातेवाईक हेही निफाड उपजिल्हा रु ग्णालयात दाखल झाले होते.

Web Title: The driver of the carriage in bulk