पिण्याच्या पाण्याची पाइपलाइन फुटली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2018 00:53 IST2018-11-18T00:52:54+5:302018-11-18T00:53:10+5:30
आडगाव व नाशिक शिवार परिसरातून जाणारी महापालिकेच्या पिण्याच्या पाण्याची पाइपलाइन बलरामनगर येथे (दि.१७) रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास फुटल्याने हजारो लिटर पाण्याचा अपव्यय होत आहे.

पिण्याच्या पाण्याची पाइपलाइन फुटली
आडगाव : आडगाव व नाशिक शिवार परिसरातून जाणारी महापालिकेच्या पिण्याच्या पाण्याची पाइपलाइन बलरामनगर येथे (दि.१७) रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास फुटल्याने हजारो लिटर पाण्याचा अपव्यय होत आहे. याठिकाणी सकाळी दुरु स्ती करण्यात आली, पण दुरु स्ती करताना फिटिंग प्लेट सरकली असल्याने पाइपलाइन फुटल्याचे समजते. हजारो लिटर पाण्याचा अपव्यय होत असल्याने परिसरातील नागरिकांकडून संताप व्यक्त केला. घटनेची माहिती मिळताच मनपा कर्मचारी यांनी मेनलाइन बंद केली असली तरी हजारो लिटर पाण्याचा अपव्यय सुरू आहे.