नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयातच पिण्याच्या पाण्याचा दुष्काळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2018 11:44 IST2018-02-24T11:44:25+5:302018-02-24T11:44:25+5:30

वेगवेगळ्या भागातून येणाºया नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही

Drinking water in Nashik District Collector's office | नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयातच पिण्याच्या पाण्याचा दुष्काळ

नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयातच पिण्याच्या पाण्याचा दुष्काळ


नाशिक : जिल्हाधिकारी कार्यालयातून संपूर्ण जिल्ह्याचा पाणी प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला जातो. परंतु प्रत्यक्षात जिल्हाधिकारी कार्यालयात विविध भागांतून येणाºया नागरिकांसाठी कोणत्याही प्रकारची पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली नाही. ही बाब जिल्ह्याधिकाºयांच्या लक्षात आणून देण्यासाठी समता परिषदेतर्फे जिल्हाधिकाºयांना निवेदन देत पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.
नाशिक शहरासह जिल्ह्यातील १५ तालुक्यांमधील हजारो नागरिक रोज वेगवेगळ्या कामांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात येत असतात. अनेकदा अधिकाºयांची वेळत भेट न होणे कार्यालयात येणाºया नागरिकांची गर्दी यामुळे नागरिकांना संपूर्ण दिवस जिल्हाधिकारी कार्यालयात बसून राहावे लागते. परंतु, उन्हाचे चटके जाणवण्यास सुरुवात होऊनही जिल्हाधिकारी कार्यालयात वेगवेगळ्या भागातून येणाºया नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली नाही.

Web Title: Drinking water in Nashik District Collector's office