शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

मालेगावी ९० लाखांचा मद्यसाठा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2019 01:29 IST

महाराष्टÑ राज्यात प्रतिबंधित असलेला ८९ लाख ४२ हजार ४०० रुपये किमतीचा मद्यसाठा व ११ लाख रुपये किमतीचा ट्रक, ३ हजार रुपये किमतीचा भ्रमणध्वनी असा एक कोटी ४५ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल राज्य उत्पादन शुल्काच्या भरारी पथकाने जप्त केला.

मालेगाव : महाराष्टÑ राज्यात प्रतिबंधित असलेला ८९ लाख ४२ हजार ४०० रुपये किमतीचा मद्यसाठा व ११ लाख रुपये किमतीचा ट्रक, ३ हजार रुपये किमतीचा भ्रमणध्वनी असा एक कोटी ४५ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल राज्य उत्पादन शुल्काच्या भरारी पथकाने जप्त केला.मुंबई-आग्रा महामार्गावरील सायने शिवारातील एका हॉटेलजवळ उभ्या असलेल्या ट्रकमधून हा मद्यसाठा जप्त करण्यात आला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाचे निरीक्षक दीपक परब, दुय्यम निरीक्षक दिगंबर शेवाळे, अशोक तारू, कर्मचारी सदा जाधव, सुरेश सेगर, राहुल पवार यांना केवळ हरियाणा राज्यात विक्रीसाठी असलेला मद्यसाठा महाराष्टÑात विक्रीसाठी येत असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार पथकाने गेल्या दोन दिवसांपासून मुंबई- आग्रा महामार्गावरील वाहनांसह हॉटेल परिसरात उभ्या राहणाऱ्या वाहनांची तपासणी सुरू केली होती. सायने शिवारातील एका हॉटेलवर ट्रक (क्र. डीएल ०१ जेजे ५५००) हा संशयास्पदरीत्या उभा असल्याचे आढळून आले. वाहनचालकाची कसून चौकशी केल्यानंतर वाहनात संरक्षण विभागाचे साबन, शॅम्पू व इतर घरगुती साहित्य असल्याची बिल्टी दाखवली. भरारी पथकाने वाहनाची झडती घेतली असता ट्रकमध्ये प्लॅस्टिक कागदांमध्ये ९६० बॉक्समध्ये विदेशी मद्याच्या बाटल्या आढळून आल्या.

टॅग्स :Policeपोलिसliquor banदारूबंदी