देवळालीत बेकरीला भीषण आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2019 01:13 IST2019-04-25T01:13:40+5:302019-04-25T01:13:57+5:30

देवळाली येथील बेकरीला बुधवारी (दि. २४) सकाळी भीषण आग लागल्याने बेकरी शॉपचे संपूर्ण साहित्य भस्मसात झाले आहे. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

Dreadful fire in Deolali bakery | देवळालीत बेकरीला भीषण आग

देवळालीत बेकरीला भीषण आग

देवळाली कॅम्प : देवळाली येथील बेकरीला बुधवारी (दि. २४) सकाळी भीषण आग लागल्याने बेकरी शॉपचे संपूर्ण साहित्य भस्मसात झाले आहे. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. या घटनेत सुमारे दहा लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगितले जाते. सुदैवाने या दुर्घटनेत जीवितहानी झाली नाही.  सकाळी सिल्वाना बेकरीतून धूर बाहेर येत असल्याचे पाहून स्थानिक नागरिकांना आग लागल्याचे समजले. त्यानंतर तातडीने नागरिकांनी याबाबत कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या अग्निशमन विभागाला माहिती दिली.
बेकरीचे मालक इकबाल शमसी यांनी दिलेल्या माहितीनुसार या आगीमध्ये दोन केक काउंटर, दोन फ्रीज, तीन कपाटे, दोन ओव्हन यांसह अन्य सामान व बेकरीतील विविध उत्पादने जळून खाक झाली आहेत.

Web Title: Dreadful fire in Deolali bakery