शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

नाटक हे सामाजिक माध्यम: प्रेमानंद गज्वी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2018 01:04 IST

मराठी नाटक जगाच्या पाठीवर कुठेही होत असेल किंवा पूर्वी झाले असेल तर त्याचाही विचार आपण केला पाहिजे. त्याचा हेतू असा की, मराठी माणसं तेव्हा काय करीत होती? त्या-त्या काळातले सामाजिक आणि सांस्कृतिक आयाम काय होते, हे समजण्यासाठी नाटक हे उत्तम माध्यम आहे. त्यामुळे रंगभूमीकडे केवळ मनोरंजन अशा संकुचित दृष्टीने बघणे आधी थांबविले पाहिजे, असे प्रतिपादन ९९व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष नाटककार प्रेमानंद गज्वी यांनी केले आहे.

ठळक मुद्दे सावानाच्या ग्रंथालय सप्ताहाचा शुभारंभ

नाशिक : मराठी नाटक जगाच्या पाठीवर कुठेही होत असेल किंवा पूर्वी झाले असेल तर त्याचाही विचार आपण केला पाहिजे. त्याचा हेतू असा की, मराठी माणसं तेव्हा काय करीत होती? त्या-त्या काळातले सामाजिक आणि सांस्कृतिक आयाम काय होते, हे समजण्यासाठी नाटक हे उत्तम माध्यम आहे. त्यामुळे रंगभूमीकडे केवळ मनोरंजन अशा संकुचित दृष्टीने बघणे आधी थांबविले पाहिजे, असे प्रतिपादन ९९व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष नाटककार प्रेमानंद गज्वी यांनी केले आहे.सार्वजनिक वाचनालय नाशिक यांच्यातर्फे मु. शं. औरंगाबादकर सभागृहात शुक्रवारी (दि.१४) ग्रंथालय सप्ताहाच्या शुभारंभप्रसंगी मराठी रंगभूमी स्थिती-गती विषयावर ते बोलत होते. व्यासपीठावर सावानाचे अध्यक्ष प्रा. विलास औरंगाबादकर यांच्यासह प्रमुख सचिव श्रीकांत बेणी, ग्रंथ सचिव बी. जी. वाघ, नाटककार दत्ता पाटील, कार्याध्यक्ष धर्माजी बोडके उपस्थित होते. प्रेमानंद गज्वी म्हणाले, नाटक हे फार गंभीर माध्यम आहे. रंगभूमीचा हेतू आहे जो प्रामुख्याने प्रबोधन आहे, हे विसरून चालणार नाही.आपण मराठी नाटकाची परंपरा सांगतांना विष्णुदास भावेंपासून सांगतो. खरंतर त्यांच्या आधीही कर्नाटकामध्ये मराठी रंगभूमी होती. त्याचाही उल्लेख आपण केला पाहिजे. रंगभूमीबद्दल आपण फार विचार करत नाही, असा गंभीर विचार करून गंभीरपणे नाटक लिहिणारी नाटककार मंडळी शोधावी लागतील. जे नवीन प्रश्न निर्माण झालेत, त्यावर नाटकाच्या माध्यमातून आज भाष्य करणारे कोण डोळ्यासमोर येतात? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.दरम्यान, ९९व्या अखिल मराठी नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याच्या पार्श्वभूमीवर सावनातर्फे नाटककार दत्ता पाटील यांच्या हस्ते प्रेमानंद गज्वी यांचा नागरी सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक श्रीकांत बेणी यांनी केले, तर सूत्रसंचालन शंकर बोºहाडे यांनी केले.सध्याचे नाटक पुरेसे गंभीर नसल्याची खंतसध्याच्या स्थितीत होणाऱ्या उलथापालथींवर कुणी नाट्यभाषेतून व्यक्त झालेय का? असा प्रश्न उपस्थित करतानाच व्यावसायिक रंगभूमीला पर्याय म्हणून अगदी विजय तेंडुलकरांच्या काळापर्यंत प्रायोगिक रंगभूमीचा पर्याय म्हणून विचारही केला गेलेला नाही, काही ठोस उभेही केले गेले नाही. त्यामुळे प्रायोगिक रंगभूमी आपोआप व्यावसायिक रंगभूमीत विलीन होत गेली. या दृष्टीने विचार करणारे लोक आपल्याकडे नाहीत असे नाही, पण पुरेसे गंभीर नाहीत त्यामुळे सध्याचे नाटकही पुरेसे गंभीर नसल्याची खंत प्रेमानंद गज्वी यांनी यावेळी व्यक्त केली.

टॅग्स :Nashikनाशिकcultureसांस्कृतिक