ओझर येथे डॉ. आंबेडकर यांना अभिवादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2021 18:50 IST2021-04-14T18:49:03+5:302021-04-14T18:50:28+5:30
ओझर : डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांची १३० वी जयंती गावातील विविध ठिकाणी प्रतिमापूजन करून साजरी करण्यात आली.सुरुवातीस सर्वच थोर महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले.

ओझर येथे डॉ. आंबेडकर यांना अभिवादन
ओझर : डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांची १३० वी जयंती गावातील विविध ठिकाणी प्रतिमापूजन करून साजरी करण्यात आली.सुरुवातीस सर्वच थोर महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले.
राज्यात लागू झालेल्या कडक निर्बधांमुळे डॉ आंबेडकर यांची जयंती मिलिंद नगर राजवाडा, शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने व ओझर शहर शिवसेना व युवासेना यांच्या वतीने तसेच वीर तानाजी चौक, गाडेकरवाडी, पंचशील नगर, समता नगर, श्रमिक नगर या ठिकाणी प्रतिमापूजन करण्यात आले.
कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करत, फिजिकल डिस्टन्सचे पालन करत अंत्यत साधेपणाने आंबेडकर जयंती सर्वत्र साधेपणाने साजरी करण्यात आली. याप्रसंगी शिवसेना उपतालुका प्रमुख प्रकाश महाले, लोकसभा संघटक प्रदीप अहिरे, माजी उपसरपंच हेमंत जाधव, माजी उपसरपंच धर्मेंद्र जाधव, आरपीआय (आठवले गट) उपाध्यक्ष रवींद्र जाधव, पोलिस उपनिरीक्षक गणपत जाधव, प्रकाश कडाळे, कामेश शिंदे, ओझर शहराध्यक्ष नितीन काळे, राहुल आहिरे, सिद्धांत आहिरे, वसंत वाघमारे, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा सरचिटणीस विनोद विधाते, आनंद जाधव, राजेश देशमुख, शेखर कदम, विकी ताडे, सतीश देशमुख, प्रताप आंबेकर, जनार्दन कदम, आशिष गणोरे यासह शिवजयंती उत्सव समिती पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.