शहरं
Join us  
Trending Stories
1
आता उद्धव ठाकरेंनी सांगितले, मविआ राज्यात किती जागा जिंकणार; दोन आकड्यांतून संकेत...
2
हे बळी नव्हे तर खून...! घाटकोपर दुर्घटनेवरून देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
3
आज बरसणार शब्दबाण! महायुती दाखवेल शिवाजी पार्कवर दम; बीकेसीत ‘इंडिया’ करणार शक्तिप्रदर्शन
4
Diabetes पासून हार्ट डिजीज पर्यंतचे उपचार करणं होणार स्वस्त; सरकारनं ४१ औषधांच्या किंमती केल्या कमी
5
आजचे राशीभविष्य १७ मे २०२४; आजचा दिवस अनुकूल, आनंदाचे वातावरण राहिल
6
अखेर भावेश भिंडे जेरबंद, उदयपूरच्या रिसॉर्टमधून घेतले ताब्यात; ६० तासांनंतर बचावकार्य थांबले
7
"बच्चन घराण्याचे संस्कार", हात फ्रॅक्चर असलेल्या आईला सांभाळताना दिसली आराध्या, ऐश्वर्याच्या लेकीचं होतंय कौतुक
8
भावेश भिंडेची १०० कोटींची कमाई? निविदा १० वर्षांसाठी मंजूर, पण दिली ३० वर्षांची परवानगी
9
रेल्वेने मुंबई महापालिकेचे थकविले ५७२ कोटी; २२ वर्षे पाणीपट्टी, मालमत्ता कर भरलाच नाही
10
काँग्रेस आणि आपमध्ये दुरावा वाढला? राहुल गांधीच्या सभेचे केजरीवालांना निमंत्रण नाही
11
ज्यांना ‘नकली भाजप’ मान्य नाही त्यांनी आम्हाला मत द्यावे, हिंमत असेल तर...: उद्धव ठाकरे
12
बजेट धर्मावर आधारित कधीच नसते, जातींचा विचार करुन देश चालत नाही: शरद पवार
13
शरद पवार गटाच्या नेत्यांना जमावबंदीच्या नोटिसा; १५ ते १९ मे कुठेही फिरु नका, पोलिसांचा आदेश
14
...तर ईडी आरोपीला अटक करू शकत नाही; सुप्रीम कोर्टाचा निकाल, जामिनासाठी अर्ज अनावश्यक 
15
आज पंतप्रधान मोदींची शिवाजी पार्कवर सभा; वाहतूक वळविली, पाहा, महत्त्वाचे बदल
16
कोकण रेल्वेच्या मार्गातील अडथळे होणार दूर, तिन्ही मागण्या पूर्ण करु: रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव
17
काँग्रेसच्या धोरणांनी गरिबी वाढली; नितीन गडकरी यांची टीका
18
शक्तिप्रदर्शनाला महिला बचतगट लाभार्थींची ताकद; खासदारांबरोबरच आमदारांचीही कसोटी
19
निवडून आल्यावर काय करणार? नागरी प्रश्नांना वर्षा गायकवाड यांच्या ‘न्यायपत्रा’ने हमी
20
ढिगाऱ्याखाली कोणी उरले नाही, काम थांबले; महापालिका आयुक्तांची माहिती

लाल डब्यात आचारसंहितेला ‘डबलबेल’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2019 1:10 AM

महाराष्ट विधानसभेच्या निवडणुकीचा बिगुल वाजला अन् सरकारी जाहिरातींवर तसेच लोकप्रतिनिधींनी केलेल्या विकासकामांच्या फलकांवर लगोलग वर्तमानपत्रांचे कागद चिकटविले गेले.

नाशिक : महाराष्ट विधानसभेच्या निवडणुकीचा बिगुल वाजला अन् सरकारी जाहिरातींवर तसेच लोकप्रतिनिधींनी केलेल्या विकासकामांच्या फलकांवर लगोलग वर्तमानपत्रांचे कागद चिकटविले गेले. कुठे कोनशिला कापडांमध्ये घट्ट बांधल्या गेल्या, तर कुठे रंगकाम करण्यात आले. मात्र, ‘बहुजन हिताय.. बहुजन सुखाय’ हे ब्रीद घेऊन खेडोपाडीच्या रस्त्यांवर धावणाऱ्या एसटी महामंडळाच्या लाल डब्यात मात्र या आचारसंहितेला सोयीस्कररीत्या डबलबेल देण्यात आली आहे. निवडणूक आयोगाच्या कृपेने लाल डब्यात सरकारी योजनांची आरामात सफर होत असताना आयोगाची करडी नजर असलेला हेडलाइट मात्र गूल झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.आचारसंहितेदरम्यान, सरकारचा अथवा कोणत्याही राजकीय पक्षाचा, त्याच्या उमेदवाराचा प्रचार होऊ नये, यासाठी काळजी घेतली जाते. सर्वत्र आचारसंहितेची अंमलबजावणी होत असताना एसटी महामंडळ मात्र त्याबद्दल अनभिज्ञ आहे की काय, अशी शंका यावी. एसटी महामंडळाच्या ताफ्यातील अगदी शिवशाहीपासून ते हात देईल तेथे थांबा देणाºया लाल डब्यापर्यंत बिनदिक्कतपणे सरकारी योजनांच्या जाहिराती झळकत आहेत. एसटीमधून रोज लाखो प्रवासी प्रवास करीत असतात. त्यातून सरकारी योजनांची माहिती पोहोचविण्याचा सरकारचा प्रयत्न बहुपयोगी असला तरी, आचारसंहितेत सर्वत्र झाकाझाक करणाºया सरकारी यंत्रणेला एसटीत झळकलेल्या जाहिराती मात्र अद्याप नजरेला पडल्या नाहीत. प्रत्येक आसनाच्या मागे विविध योजनांची माहिती देण्यात आली आहे.एसटीत मात्र ‘आपले सरकार’राज्यात सत्ताधारी पक्षांच्या नियंत्रणाखालीच सरकारी यंत्रणा काम करीत असते. असे असले तरी निवडणुका लागतात तेव्हा सरकारऐवजी निवडणूक आयोगाचे त्यावर नियंत्रण प्रस्थापित होत असते. निवडणूक यंत्रणेकडून शहरात आणि गावागावांत आचारसंहितेचा भंग होऊ नये म्हणून अगदी महापुरुषांच्याही नावाला कागद चिकटविला जात असताना एसटीत मात्र ‘आपले सरकार’ दिमाखात झळकत आहे.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019state transportएसटीElectionनिवडणूक