गोदा युनियन संस्थेचे संचालक कैलास गिते, माजी उपसरंपच खंडु गिते यांच्या नेतृत्वाखाली ग्रामविकास पॅनेल तर सुनील गिते यांच्या आदर्श ग्रामविकास पॅनेलमध्ये सरळ लढत झाली होती.यात ग्रामविकास पॅनेलला मतदारांनी स्पष्ट बहुमत देत ग्रामपंचायतीची सत्ता दिली तर माजी उपसरपंच गिते यांना एकही जागा जिंकता आली नाही. ग्रामविकास पॅनेलकडून कैलास धोंडीराम गिते, विलास बाबुराव गिते, सुखदेव एकनाथ गिते, शांताराम रूंजा माळी, सुमन सुखदेव गिते, सुमन दत्तू गिते, चंद्रभागा कचेश्वर वाघ, शीतल पांडुरंग गिते व क्रांती सतीश रामराजे आदी सर्व नऊ सदस्य विजयी झाले आहेत.
ब्राह्मणवाडे ग्रामपंचायतीत ग्रामविकास पॅनलचे वर्चस्व
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2021 00:38 IST