आडगावमधील घरफोडीत सोन्याचे दागिणे लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2018 18:54 IST2018-09-12T18:51:52+5:302018-09-12T18:54:23+5:30
नाशिक : बंद घराच्या दरवाजाचे कडी-कोयंडा व कुलूप तोडून चोरट्यांनी भरदिवसा हजारो रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना मंगळवारी (दि़११) सकाळच्या सुमारास घडली़

आडगावमधील घरफोडीत सोन्याचे दागिणे लंपास
नाशिक : बंद घराच्या दरवाजाचे कडी-कोयंडा व कुलूप तोडून चोरट्यांनी भरदिवसा हजारो रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना मंगळवारी (दि़११) सकाळच्या सुमारास घडली़
आडगाव पोलीस ठाण्यात संतोष तानाजी दिंडे (रा. म्हसोबा मळा, वरवंडीरोड, नांदूरनाका) यांनी दिलेल्या फियार्दीनुसार मंगळवारी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचा कडीकोयंडा तोडून घरात प्रवेश केला़ तसेच घरातील सहा हजार रुपयांची सोन्याची ठुसी, आठ हजार रुपयांचे सोन्याचे झुबे, वीस हजार रुपयांचे सोन्याचे वेल, आठ हजार रुपयांचे सोन्याच्या तीन अंगठ्या, तीन हजार रुपयांचे सोन्याचे ओमपान,पाच हजार रुपयांचा मोबाईल, दोन हजार ८०० रुपयांचे चांदीचे जोडवे, एक हजार २०० रुपयांच्या तोरड्या व पंधरा हजार रुपयांची रोकड असा ६९ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला.
या प्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़