शहरं
Join us  
Trending Stories
1
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
2
हैदराबादमध्ये पावसाचं थैमान! SRH vs GT सामना रद्द झाल्यास संपुष्टात येईल RCB चं आव्हान?
3
'भाजपचे सरकार कायम राहणार नाही, आज ना उद्या नक्की बदला घेईन', ममता बॅनर्जींचा इशारा
4
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान
5
"मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, गोहत्या करणाऱ्यांना उलटे लटकवून सरळ करू", अमित शाहांचा इशारा
6
‘मी त्यांच्यासोबत, जर स्वाती मालिवाल यांना वाटलं तर…’ गैरवर्तन प्रकरणी प्रियंका गांधी यांचं मोठं विधान 
7
"यासारखी अमानुष गोष्ट नाही..."; पंतप्रधान मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून संजय राऊतांचा हल्लाबोल
8
"लाचारीच्या सर्व मर्यादा सोडल्या"; जिरेटोप प्रकरणावरून शरद पवारांनी प्रफुल्ल पटेलांना फटकारलं!
9
विकी कौशलची 'ही' इच्छा अजूनही अपूर्णच! म्हणाला, 'कधी करेन माहित नाही पण...'
10
Hina Khan : "40 डिग्रीत वेदनादायक पीरियड क्रॅम्प्सने त्रस्त असताना..."; हिना खानने सांगितला अनुभव
11
आमनेसामने Video: ठाकरे गटाकडून 50 खोकेची घोषणाबाजी; एकनाथ शिंदेंकडून धनुष्यबाणाचा इशारा
12
‘पृथ्वीराज चव्हाण यांनी पोपट घेऊन भविष्यवाणी सांगण्यास बसावे’, अजित पवार गटाचा टोला 
13
Blog: इरफान पठाणला बोलायला काय जातंय! परदेशी खेळाडू नसतील तर IPL मध्ये मजा राहील का?
14
‘मोदींनी एकदा मला फोन केला आणि म्हणाले, माझा अमेरिकेचा व्हिसा फेटाळलाय, तेव्हा मीच…’ शरद पवार यांनी सांगितली आठवण
15
मराठमोळ्या अभिनेत्रीसोबत रिलेशनशीपमध्ये होता 'हीरामंडी'चा अभिनेता, आता ब्रेकअपबाबत केला खुलासा
16
"महिलांच्या कमावण्याच्या नादात वाढतंय घटस्फोटाचं प्रमाण"; सईद अन्वरचं वादग्रस्त विधान! VIDEO व्हायरल
17
T20 WC पूर्वी भारतीय संघाच्या सराव सामन्याची तारीख व संघ ठरला! जाणून घ्या अपडेट्स 
18
Adani Group : अदानींच्या 'या' कंपनीला मोठा झटका, नॉर्वेच्या सर्वात मोठ्या वेल्थ फंडानं केलं ब्लॅकलिस्ट
19
मनोज जरांगे पाटील यांची ८ जून रोजी होणारी सभा रद्द, या दोन कारणांमुळे घेतला निर्णय
20
Fact Check: Video - मुंबईत भाजपाच्या किटमध्ये सोन्याची बिस्किटं सापडली?; जाणून घ्या, 'सत्य'

डोंबिवलीच्या गुन्हेगारास नाशकात ठोकल्या बेड्या

By ऑनलाइन लोकमत | Published: January 05, 2020 4:43 AM

कल्याण-खंबाळपाडा रस्त्यावर वाद घालून एका इसमावर गुप्तीने वार करून प्राणघातक हल्ला करणाऱ्या डोंबिवलीच्या गुन्हेगाराच्या गुन्हे शाखा युनिट-१ च्या पथकाने पंचवटीत अटक केली.

नाशिक : थर्टीफर्स्टच्या रात्री कल्याण-खंबाळपाडा रस्त्यावर वाद घालून एका इसमावर गुप्तीने वार करून प्राणघातक हल्ला करणाऱ्या डोंबिवलीच्या गुन्हेगाराच्या गुन्हे शाखा युनिट-१ च्या पथकाने पंचवटीत अटक केली. संशयित अजय महापुरे (२२, रा. रामनगर, कल्याण, मूळ पंचवटी) याच्याविरुद्ध पंचवटी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.शहर गुन्हे शाखा युनिट एकचे पथक शहरात शनिवारी गस्त घालत असताना अजय हा कमरेला गुप्तीसारखे शस्त्र लावून पंचवटीतील भक्तिधामसमोर फिरत असल्याची माहिती उपनिरीक्षक बलराम पालकर यांच्या पथकातील शिपाई संदीप भुरे यांना मिळाली. पोलिसांनी भक्तिधाम येथे सापळा रचून महापुरेला अटक केली. पोलिसांनी त्याचा समाचार घेतला असता त्याने ३१ डिसेंबर रोजी रात्री कल्याण येथील एका हॉटेलसमोर लोकांशी नाचण्यावरून वाद घालत फिर्यादी अरुण सरोज (२२, रा. गणेशनगर, कल्याण) यांच्यावर गुप्तीने वार करत गंभीर जखमी केले. महापुरे व त्याच्या साथीदारांविरुद्ध डोंबिवलीच्या टिळकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.