शहरं
Join us  
Trending Stories
1
Controversial Decision? आयुष बदोनीची विकेट वादात अडकली, KL Rahul संतापला, MI च्या बाजूने झुकवलेला सामना, Video 
2
लखनौ सुपर जायंट्सचा विजय! Mumbai Indians प्ले ऑफसाठी आता दुसऱ्यांवर अवलंबून  
3
एका महिन्यानंतर पाऊसच पाऊस, भारतासह या शेजारील देशांनाही मिळणार दिलासा
4
आघाडीच्या फलंदाजांनी शस्त्र टाकल्यानंतर...! हार्दिक पांड्याचा रोख रोहित शर्माकडे? म्हणाला... 
5
भाजपच्या पीयूष गोयल यांच्याविरोधात भूषण पाटील; काँग्रेसकडून राज बब्बर यांनाही उमेदवारी...
6
₹42 च्या शेअरवर गुंतवणूकदारांची झुंबड, लागलं 20% चं अप्पर सर्किट; जपानमधून मिळाली आहे मोठी ऑर्डर!
7
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : आरोपी समीर कुलकर्णी यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा, खटल्याला स्थगिती
8
राशिद खानच्या नेतृत्वाखाली अफगाणिस्तान ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळणार, युवा खेळाडूंना संधी 
9
गडचिरोली सीमेवर चकमक; १० नक्षलवाद्यांचा खात्मा 
10
Video: पाळीव कुत्र्याचा सहा वर्षीय चिमुकलीवर हल्ला; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल...
11
आनंदाची बातमी...! ₹75000 पार जाणाऱ्या Gold Price मध्ये पुन्हा मोठी घसरण, पटा-पट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट 
12
देशात फक्त मोदी पॅटर्न चालतो, बाकी सगळे भंगारात; एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर प्रहार
13
BANW vs INDW: भारताचा झंझावात कायम; पावसाची 'बॅटिंग' अन् बांगलादेशचा सलग दुसरा पराभव
14
दुर्दैवी! प्रसूती दरम्यान 'बत्ती गूल'; टॉर्चच्या प्रकाशात सिझर, पण बाळासह आईचा मृत्यू
15
भारतीय संघ दोन तुकड्यांमध्ये अमेरिकेला रवाना होणार, पहिली बॅच २१ मे रोजी तर... 
16
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
17
अरविंद सावंतांविरोधात तिकीट मिळालेल्या यामिनी जाधव यांची अशी आहे राजकीय कारकीर्द
18
कल्याणमध्ये तिरंगी लढत होणार; लोकसभेसाठी वंचितकडून आणखी ३ उमेदवारांची घोषणा
19
Team India for T20WC 2024 : वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहीर, हार्दिक पांड्या उप कर्णधार, KL Rahul चा पत्ता कट
20
मोठी अपडेट्स : Rinku Singh ची होणार १५ मध्ये एन्ट्री? भारतीय संघात केला जाऊ शकतो बदल

समाजाला साहित्य नक्की हवंय का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2019 2:10 AM

आपल्या समाजाला नक्की साहित्य हवंय का ? माणसे काही वाचतात की नाही ? त्यांना त्याची निकड वाटते का, असे प्रश्न साहित्यिक म्हणून आपल्याला पडतो. पण लेखकाने गणितज्ज्ञ रामानुजमसारखे मला येतंय म्हणून मी गणित करतो, अशा भावनेनेच निर्मिती करायला हवी, असे मत ज्येष्ठ साहित्यिक श्याम मनोहर यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देश्याम मनोहर यांचा सवाल : कुसुमाग्रज राष्टÑीय साहित्य पुरस्कार वेद राही यांना प्रदान

नाशिक : आपल्या समाजाला नक्की साहित्य हवंय का ? माणसे काही वाचतात की नाही ? त्यांना त्याची निकड वाटते का, असे प्रश्नसाहित्यिक म्हणून आपल्याला पडतो. पण लेखकाने गणितज्ज्ञ रामानुजमसारखे मला येतंय म्हणून मी गणित करतो, अशा भावनेनेच निर्मिती करायला हवी, असे मत ज्येष्ठ साहित्यिक श्याम मनोहर यांनी व्यक्त केले.यशवंतराव चव्हाण महाराष्टÑ मुक्त विद्यापीठाच्या वतीने श्याम मनोहर यांच्या हस्ते ज्येष्ठ साहित्यिक वेद राही यांना कुसुमाग्रज राष्टÑीय साहित्य पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर कुलगुरू ई. वायुनंदन आणि कुसुमाग्रज अध्यासनच्या संचालिका प्रा. विजया पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.‘मी थोडं काहीतलं आणि बरंचसं बाहीतलं बोलणार आहे,’ असे सांगत श्याम मनोहर यांनी त्यांची मते रोखठोकपणे मांडली. ‘कोणताही राष्टÑीय पुरस्कार मिळाल्याने तो लेखक अन्य भाषकांना प्रथम माहिती होतो. पण तेवढ्यावर ही प्रक्रिया थांबायला नको. तर त्या लेखकाचे साहित्य, त्याचे विचार हे अन्य भाषांमध्ये भाषांतरीत होत पुढे जायला हवे. असे राष्टÑीय स्वरूपाचे साहित्य वाचन करून त्याची यादी नवोदित लेखकांनी तयार करावी. तसेच त्यांचे साहित्य अधिकाधिक भारतीय भाषांमध्ये प्रसारित करण्याचा प्रयत्न करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी नमूद केले.यावेळी पुरस्कारार्थींच्या वतीने दयाराम पाडलोस्कर आणि योजना यादव यांनी प्रातिनिधिक मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कुलसचिव दिनेश भोंडे यांनी तर प्रमुख पाहुण्यांचा परिचय आणि मानपत्रवाचन दत्ता पाटील यांनी केले. प्रफुल्ल चिकेरूर यांनी सूत्रसंचालन केले.मानधन मिळणेहा लेखकाचा हक्कजगभरातील विविध भाषांमधील लेखक काय ज्ञान निर्माण करीत आहेत, ते सजगपणे पाहून त्याचा पट मांडला जायला हवा. लेखकाला पुरस्कार मिळणे, हा त्याचा हक्क नाही, मात्र मानधन मिळणे हा त्याचा हक्क आहे. पण पूर्णवेळ साहित्यिक बनून त्यावरच उपजीविका चालवणे, हे आपल्या संस्कृतीत तरी शक्य नाही. तरीदेखील लेखकाने ध्यासाने लेखन करीत रहावे. रात्री-अपरात्री काही सुचले तरी ते लिहून ठेवावे,’ असेही श्याम मनोहर यांनी सांगितले.बागुल-विशाखा पुरस्कारांचे वितरणविद्यापीठाच्या अन्य राज्यस्तरीय पुरस्कारांचे वितरणदेखीलकरण्यात आले. बाबूराव बागुल कथा पुरस्कार गोवा येथीलदयाराम पाडलोस्कर (खपली निघाल्यानंतर- २०१७ सालासाठी)तसेच गडचिरोली येथील प्रमोद बोरसरे (पारवा- २०१८ सालासाठी) यांन प्रदान करण्यात आला तर विशाखा काव्याचा प्रथम पुरस्कारनांदेड येथील अमृत तेलंग (काव्य संग्रह: पुन्हा फुटतो भादवा),द्वितीय पुरस्कार पुणे येथील कवयित्री योजना यादव(मरी मरी जाय शरीर), तर नाशिकच्या महेश लोंढे(निद्रानाशाची रोजनिशी) यांना तृतीय क्रमांकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.राष्टÑाचा आत्मा महाराष्टÑात : वेद राहीपुरस्कार सोहळ्याप्रसंगी बोलताना प्रख्यात साहित्यिक आणि चित्रपट दिग्दर्शक वेद राही यांनी, ‘भारताचा आत्मा हा महाभारतात, तर राष्टÑाचा आत्मा महाराष्टÑात वसलेला आहे. महाभारतात गीता तर महाराष्टÑातील ज्ञानेश्वरीत अद्भुत ज्ञान सामावले आहे. माझा कुसुमाग्रजांशी संबंध त्यांच्या ज्ञानेश्वरीवरील एका पुस्तकामुळे आला. तर नाशिकचेच ज्येष्ठ पत्रकार व साहित्यिक मो. ग. तपस्वी यांनी ज्ञानेश्वरीवर केलेल्या हिंदी अनुवादामुळे मला ज्ञानेश्वरी उमगली. संत ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी आणि अमृतानुभव वाचून मी अक्षरश: स्तब्ध झालो होतो.च् वीर सावरकर या चित्रपटासाठी लेखन आणि दिग्दशर््ान करताना मला खरंच जगणं कशाला म्हणतात, त्याचा अर्थ उमगला. या सर्व कारणांमुळेच माझ्यासाठी हा पुरस्कार खूप विश्ोष आहे. कुसुमाग्रजांच्या नावाने मिळालेल्या या पुरस्काराने माझ्या मनात अजून एक ज्ञानदिवा उजळला आहे, ’ असे सांगत राही यांनी त्यांचे आणि नाशिकचे ऋणानुबंध नमूद केले. यावेळी राही यांनी कुसुमाग्रजांच्या एका कवितेचा अनुवाद करीत ‘जाते जाते गाऊंगा मै, गाते गाते जाऊंगा मै’’ हे काव्यदेखील सादर केले.

टॅग्स :Nashikनाशिकcultureसांस्कृतिक