भुजबळांच्या सभेप्रंसगी डॉक्टरचा खिसा कापला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 22:47 IST2021-09-27T22:47:17+5:302021-09-27T22:47:48+5:30
चांदवड : येथील ऑक्सिजन प्लांट उद्घाटन समारंभप्रसंगी पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या स्वागतादरम्यान चांदवड उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. स्वप्नील वाळुंज यांच्या खिशातून रोख १४ हजार रुपये भामट्याने लंपास केल्याची फिर्याद डॉ. वाळुंज यांनी चांदवड पोलीस स्टेशनला दिली आहे.

भुजबळांच्या सभेप्रंसगी डॉक्टरचा खिसा कापला
ठळक मुद्देपोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला
चांदवड : येथील ऑक्सिजन प्लांट उद्घाटन समारंभप्रसंगी पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या स्वागतादरम्यान चांदवड उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. स्वप्नील वाळुंज यांच्या खिशातून रोख १४ हजार रुपये भामट्याने लंपास केल्याची फिर्याद डॉ. वाळुंज यांनी चांदवड पोलीस स्टेशनला दिली आहे.
पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सलीम शेख हे करीत आहेत.