शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

काम करा, अन्यथा शाल-श्रीफळ तयार

By admin | Updated: July 31, 2016 00:23 IST

अशोक चव्हाण : कॉँग्रेस बैठक : राष्ट्रवादीशी ‘संग’ नको, बैठकीतील सूर

नाशिक : आगामी निवडणुकांमध्ये शिवसेना-भाजपा सोडा, मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी कॉँग्रेसला आधी आवरा. त्यांच्यासोबत आघाडी केल्याने काँग्रेस पक्ष रसातळाला जात आहे. त्यांच्याशी अजिबात आघाडी करता कामा नये, असा सूर जिल्ह्यातील कॉँग्रेसच्या पदाधिकारी व लोकप्रतिनिधींनी प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांच्यासमोर व्यक्त केला. त्यावर आघाडीचा निर्णय स्थानिक पातळीवरच देण्यात येणार आहे. त्यामुळे तुम्हाला हवे ते करा. मात्र आगामी काळात पक्ष मजबूत झाला पाहिजे, नाही तर मी शाल व श्रीफळ विकत घेऊन ठेवले असून, पक्ष मजबूत झाला नाही तर शाल-श्रीफळ देऊन मोकळे करेल, असा परखड इशारा त्यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांना दिला.हॉटेल ग्रीन व्ह्णू येथे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत जिल्ह्णातील पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीत बहुतांश तालुकाध्यक्षांनी तसेच लोकप्रतिनिधींनी राष्ट्रवादीशी आघाडी नको, असा सूर लावला. नाशिक तालुकाध्यक्ष नियुक्तीवरून प्रल्हाद जाधव यांनी ४० वर्षांपासून काम करतो आहे, अजून तालुकाध्यक्ष कोण ते माहीत नाही, असा घरचा अहेर दिला. लक्ष्मण मंडाले यांनी देवळाली विधानसभा मतदारसंघ गेल्या २० वर्षांपासून राष्ट्रवादी कॉँग्रेसला सोडला जात असल्याने भविष्यात या मतदारसंघात पंजा चिन्ह राहील की नाही, असे सांगितले. अरुण अहेर यांनी तर येवला तालुक्यातील माजी पालकमंत्री छगन भुजबळ यांनी कशाप्रकारे दहशत केली. कसे उमेदवार पळविले. कसे कामे देऊन कॉँग्रेसचे पदाधिकारी फोडले, याचे वर्णन करत आता तरी पक्षश्रेष्ठींनी जागे व्हावे, असा सूर लावला. प्रकाश शिंदे यांनी दिंडोरीत कॉँग्रेसची परिस्थिती चांगली असल्याचे व नगराध्यक्ष कॉँग्रेसचा असल्याचे सांगितले, तर चांदवडमध्ये शिरीषकुमार कोतवालांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा जिल्हा परिषदेत विजय मिळविता येईल, अशी अपेक्षा शंकरराव गांगुर्डे यांनी व्यक्त केली. बागलाणमध्ये पक्ष मजबूत असून, आजी-माजी पदाधिकाऱ्यांनी मन लावून काम केले तर राष्ट्रवादीचा विषयच राहणार नसल्याचे जिल्हा परिषद सदस्य प्रा. अनिल पाटील यांनी सांगितले. निफाडमध्ये दहा गट असून, पक्षाने चांगले उमेदवार व पाठबळ दिल्यास जिल्हा परिषद निवडणुकीत चांगली परिस्थिती राहील, असे माजी उपाध्यक्ष दिगंबर गिते यांनी सांगितले. सिन्नरला कॉँग्रेसची परिस्थिती चांगली राहील, माणिकराव आले आणि गेले तरी कॉँग्रेस तेथेच आहे, असे विनायक सांगळे व रामराव शिंदे यांनी सांगितले. (प्रतिनिधी).