शहरं
Join us  
Trending Stories
1
‘थलपती’ बनला मुख्यमंत्री! विजय यांनी घेतली तामिळनाडूच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ
2
मोठी कारवाई! ग्वाल्हेरमध्ये पाकिस्तानी सायबर नेटवर्कचा पर्दाफाश; हॉटेलमधून ४ एजंटना अटक
3
ममतेचे जिवंत उदाहरण, लेकाच्या जीवासाठी माऊलीची तळमळ; किडनीच्या रूपाने पुन्हा देणार जन्म
4
१७ वर्षांपूर्वीची सिक्रेट भेट, एक फोन कॉल अन्..., राहुल-विजयच्या मैत्रीने असं जुळलं तामिळनाडूचं सत्तासमीकरण
5
नवं समीकरण! डिजिटल वॉरियर्स, डॉक्टर्स अन् युवा चेहरे; टीम विजय यांच्या कॅबिनेटमध्ये कुणाला संधी?
6
...तर १६ ऑगस्टपासून 'त्या' रिक्षाचालकांवर कारवाई करणं अटळ; परिवहन मंत्र्‍यांनी पुन्हा बजावलं
7
लग्नाच्या वाढदिवशीच गरोदर महिलेची हत्या; हुंड्यात 'बुलेट' न मिळाल्याने सासरच्यांनी घेतला जीव
8
‘पालखी निघाली राजाची…’, लालबागच्या राजावरील लोकप्रिय गीताचे संगीतकार नितीन मोरजकर यांचं निधन
9
"रशिया-युक्रेन युद्ध अखेरच्या टप्प्यात.."; पुतिन यांचे संकेत, ३ दिवसांच्या युद्धविरामाची घोषणा
10
टीसीएस' प्रकरण: निदा खानसोबत 'स्पॉट पंचनामा', नाशिक पोलिस आयुक्तालयात कुटुंबीयांचीही चौकशी
11
अवघ्या २९ वर्षाची किर्तना तामिळनाडूत बनणार मंत्री; थलापती विजय यांच्यासोबत आज घेणार शपथ
12
आजचे राशीभविष्य, १० मे २०२६: 'या' २ राशीच्या लोकांनी रागावर नियंत्रण ठेवा, अचानक खर्च होईल पैसा
13
ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण संतापल्या, प्रशासनाला दिला अल्टिमेटम; पुण्यात नेमकं काय घडलं प्रकरण?
14
'आधार'मधील बायोमेट्रिक 'त्रुटीभार' नागरिकांवर नको; मुंबई उच्च न्यायालयाने दिले 'यूआयडीएआय'ला निर्देश
15
हरयाणा ते बंगाल : मोदींच्या नेतृत्वात ९ राज्यांत भाजपाचे मुख्यमंत्री; अस्तित्व नसलेल्या राज्यांत रोवले भक्कम पाय
16
बोगस दिव्यांग कर्मचाऱ्यांवर उच्च न्यायालयाचा बडगा! राज्यात १२० दिवसांत पडताळणी अनिवार्य
17
विशेष लेख: विरोधी पक्ष दिसला तर लाखाचे बक्षीस द्यायचे का?
18
९४ हजार विद्यार्थ्यी मराठी विषयात नापास, अभिजात दर्जा मिळालेल्या मराठीत अपयश ही धोक्याची घंटा
19
प्रिमियम एफएसआयला सुप्रीम कोर्टाची स्थगिती, शेतकऱ्यांना 'टीडीआर'च्या माध्यमातून दिलासा
20
रशिया-युक्रेनमध्ये ३ दिवसांचा युद्धविराम; ट्रम्प यांच्या मध्यस्थीला यश, १ हजार कैद्यांची अदलाबदल
Daily Top 2Weekly Top 5

संततधारेमुळे दारणा, भावली, काश्यपी, गौतमीच्या पाणीसाठ्यात वाढ

By admin | Updated: July 24, 2014 01:05 IST

जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्यात पावसाचा जोर; बळीराजा सुखावला

नाशिक : गेल्या तीन-चार दिवसांपासून संततधार हजेरी लावणाऱ्या पावसामुळे जिल्ह्यातील धरणांचा पाणीसाठा वाढण्यास सुरुवात झाली आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात १८४८ दलघफू (३२ टक्के) पाणीसाठा आहे, तर भावली धरणाचा पाणीसाठा २८ वरून ५८३ दलघफू (४० टक्के) इतका झाला आहे.
पश्चिम पट्ट्यात पावसाचा जोर कायम असून, त्यामुळे नदी-नाले भरून वाहू लागले आहेत. गंगापूर धरणाला पाणीपुरवठा करणारी किकवी नदी भरून वाहू लागली आहे. त्यामुळे शून्य टक्के असलेला काश्यपी धरणाचा पाणीसाठा २२ दलघफू झाला आहे. त्याचप्रमाणे अवघ्या ३५० दलघफूवर आलेला दारणा धरणाचा पाणीसाठा २८०३ (३९ टक्के) इतका झाला आहे. शून्य टक्के असलेला गौतमी गोदावरी मध्यम प्रकल्पाचा पाणीसाठा १७० दलघफू झाला आहे. वालदेवीही कोरडेठाक पडलेले असताना, आता संततधार पावसामुळे वालदेवी धरणात ९३ दलघफू पाणीसाठा झाला आहे. शून्यावरच गेलेले मुकणे धरणही आता हळूहळू भरू लागले असून, २३ जुलैअखेर मुकणे धरणात २६७ दलघफू पाणीसाठा झाला आहे. जिल्ह्यात पश्चिम पट्ट्यात पावसाचा जोर कायम असून, बुधवारी दिवसभर शहरात पावसाची रिपरिप सुरू होती. जिल्ह्याच्या पूर्व भागातही काही प्रमाणात पावसाने हजेरी लावल्याने खरिपाच्या पेरण्यांना वेग येण्याची चिन्हे आहेत. (प्रतिनिधी)