शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
2
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
3
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
4
आधार कार्ड काढायला घराबाहेर पडले ते परतलेच नाहीत; पेट्रोल पंप मालकाचा २ मुलींसह संशयास्पद मृत्यू
5
Hero: ड्युअल डिस्क ब्रेक्स, मल्टीपल राइडिंग मोड्स आणि बरेच काही; हिरो एक्सट्रीम १२५ आर लॉन्च!
6
Dance Bar Raid: उल्हासनगरातील चांदणी लेडीज सर्व्हिस बारवर पोलिसांची धाड, ९ महिलांसह १५ जणांना अटक
7
अरे देवा! मेट्रो स्टेशन तयार झालं पण नंतर कळालं उंचीच कमी, पुढं जे केलं ते पाहून थक्क व्हाल
8
स्टाँग रूमचे CCTV बंद, मध्यरात्री एका पिकअप व्हॅनची एन्ट्री; RJD च्या आरोपानंतर तपासाचे आदेश
9
चीनने वाढवली लष्करी ताकद! तिसरी विमानवाहू युद्धनौका 'फुजियान' तयार, अमेरिकेची चिंता वाढली
10
कोण आहेत गजाला हाशमी? ज्यांनी अमेरिकेत रचला नवा इतिहास; भारताशी थेट कनेक्शन, जाणून घ्या
11
वीज चमकली की सुरू होतं काउंटडाउन!… काय आहे क्रिकेटच्या मैदानात क्वचित लागू होणारा '30:30 नियम'?
12
चॉकलेट की बिस्किट... आरोग्यासाठी जास्त धोकादायक काय? खाण्याआधी एकदा विचार कराच
13
बिहारमध्ये वाढलेल्या मतदानाचा अर्थ काय, कोणता फॅक्टरमुळे वाढलं मतदान? प्रशांत किशोरांनी मांडलं गणित
14
ब्रिस्बेनच्या मैदानात पावसाची बॅटिंग! टीम इंडियानं ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी-२० मालिका २-१ अशी जिंकली
15
'...तर आम्ही शिंदेंच्या शिवसेनेसोबतची दोन जिल्ह्यात युती तोडू'; नारायण राणेंचा इशारा, तेलींबद्दल काय बोलले?
16
डॉक्टरच्या लॉकरमध्ये मिळाली AK-47 रायफल, जम्मू-काश्मीर पोलीसही चकित; नेमकं प्रकरण काय?
17
"भैया मत करो...", बाईकवर मागे बसलेल्या तरुणीसोबत रॅपिडो चालकाचं धक्कादायक कृत्य
18
आधी ४५ कोटींचे मेट्रो स्टेशन बनवले, नंतर लक्षात आलं की उंची कमी झाली; मग...; हा जुगाड जाणून डोक्यावर हात माराल
19
Mumbai: कूपर रुग्णालयात मृत रुग्णाच्या नातेवाईकाकडून डॉक्टरांना मारहाण
20
"आधी कर्जबाजारी व्हायचं आणि मग पुन्हा कर्जमाफी मागायची"; राधाकृष्ण विखे पाटलांची शेतकऱ्यांवर आगपाखड

दिवाळीचा दिलासा : कुणाची सोनसाखळी तर कुणाची बाईक, मोबाईल असा चोरीला गेलेला ५६ लाख ६२ हजारांचा मुद्देमाल नाशिककरांना पोलिसांकडून समारंभपुर्वक प्रदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2017 14:40 IST

मुंबईनाका, सरकारवाडा,आडगाव, पंचवटी, म्हसरूळ, भद्रकाली, गंगापूर, सातपूर, अंबड, उपनगर, नाशिकरोड, देवळाली कॅम्प अशा विविध पोलीस ठाण्यांमध्ये दाखल असलेल्या गुन्ह्यांचा तपास पूर्ण करुन संबंधित तक्रारदारांना त्यांच्या चोरीला गेलेल्या वस्तू पोलिसांनी आज समारंभपूर्वक प्रदान केल्या

ठळक मुद्दे२३ लाख ४६ हजार ५०० रुपयांचे सोन्याचांदीचे दागिणे, २५ लाख ५५ हजार रुपये किंमतीच्या दुचाकी-चारचाकी वाहने, दोन लाख ३२ हजार ९०० रुपयांचे मोबाइल, तसचे ५ लाख २७ हजार ९६५ रुपयांचा इतर मुद्देमाल एकूण ५६ लाख ६२ हजार ४०५ रुपयांचा मुद्देमाल तक्रारदारांना वाटप करण्यात आला आहे. एकूण ६५ तक्रारदारांना त्यांच्या चोरीला गेलेल्या वस्तू परत मिळाल्या.

नाशिक : जेव्हा एखादी वस्तू घरातून अथवा रस्त्यावरून चोरीला जाते तेव्हा, ती वस्तू पुन्हा हातात येईल, याबाबत फारसा कोणालाही विश्वास नसतोच...पोलीस ठाण्यात जरी तक्रार दिली तरी त्याचा शोध कधी लागेल किंवा लागणारही नाही.... शोध लागला तरी न्यायिक प्रक्रिया कधी होईल, आणि त्या मौल्यवान वस्तू क धी हातात येईल... अशा विविध शंका व प्रश्नांचे सर्वसामान्यांच्या मनात काहूर उठलेले असते. शहरात घडलेल्या सोनसाखळी, मोबाईल, दुचाकी तसेच आर्थिक गुंतवणूकीमध्ये झालेली फसवणूक अशा विविध प्रकारच्या गुन्ह्यांचा छडा नाशिकच्या पोलीस पथकाने लावत गुन्हेगारांना गजाआडही केले आणि त्यांच्याकडून मुद्देमालही हस्तगत केला. मुंबईनाका, सरकारवाडा,आडगाव, पंचवटी, म्हसरूळ, भद्रकाली, गंगापूर, सातपूर, अंबड, उपनगर, नाशिकरोड, देवळाली कॅम्प अशा विविध पोलीस ठाण्यांमध्ये दाखल असलेल्या गुन्ह्यांचा तपास पूर्ण करुन संबंधित तक्रारदारांना त्यांच्या चोरीला गेलेल्या वस्तू पोलिसांनी आज समारंभपूर्वक प्रदान केल्या. एकूण ५६ लाख ६२ हजार रुपयांचा मुद्देमाल यावेळी तक्रारदार नाशिककरांना परत मिळाला. नाशिक पोलिसांनी धनत्रयोदशीच्या दोन दिवस अगोदर मुद्देमाला संबंधितांना देत दिवाळीचा दिलासा देत त्यांचा आनंद द्विगुणित केला.नाशिकमधील गंगापूररोड येथील रावसाहेब थोरात सभागृहात आयोजित कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख पाहूणे म्हणून आमदार देवयानी फरांदे, विशेष सरकारी वकिल अजय मिसर यांच्यासह पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र कुमार सिंगल, उपआयुक्त लक्ष्मीकांत पाटील, श्रीकृष्ण कोकाटे, माधुरी कांगणे, विजय मगर, सहाय्यक आयुक्त सचिन गोरे, राजू भुजबळ आदि मंचावर उपस्थित होते.दरम्यान मान्यवरांच्या हस्ते, २३ लाख ४६ हजार ५०० रुपयांचे सोन्याचांदीचे दागिणे, २५ लाख ५५ हजार रुपये किंमतीच्या दुचाकी-चारचाकी वाहने, दोन लाख ३२ हजार ९०० रुपयांचे मोबाइल, तसचे ५ लाख २७ हजार ९६५ रुपयांचा इतर मुद्देमाल असा एकूण ५६ लाख ६२ हजार ४०५ रुपयांचा मुद्देमाल तक्रारदारांना वाटप करण्यात आला आहे. यावेळी ‘गावकरी’च्या गुन्हयातील ७८ ठेविदारांचे बुडालेले १५ लाख तीन हजार ३३३ रुपयांच्या ठेवींची वाटप प्रक्रिया सुरू आहे. यापैकी काही ठेविदारांना डीमांड ड्राफ्टचे वाटप करण्यात आले. एकूण ६५ तक्रारदारांना त्यांच्या चोरीला गेलेल्या वस्तू परत मिळाल्या.