पेठला आदिवासी विद्यार्थ्यांसोबत दिवाळी

By Admin | Updated: October 28, 2016 23:55 IST2016-10-28T23:54:32+5:302016-10-28T23:55:53+5:30

शैक्षणिक साहित्याचे वाटप : सोशल नेटवर्किंग फोरमचा उपक्रम

Diwali with Peth tribal students | पेठला आदिवासी विद्यार्थ्यांसोबत दिवाळी

पेठला आदिवासी विद्यार्थ्यांसोबत दिवाळी

पेठ : दरवर्र्षाप्रमाणे सोशल नेटवर्किंग फोरमच्या वतीने २७ आॅक्टोबरला सकाळी गढईपाडा आणि खंबाळे या पेठजवळच्या पाड्यांवर दिवाळी साजरी करण्यात आली.
यावेळी नवीन खेळणी, शैक्षणिक साहित्य, कपडे आणि फराळाचे पदार्थ मुलांना भेट देण्यात आले. गेली सहा वर्षे दिवाळीचा पहिला दिवा आदिवासी बांधवांच्या दारी लावल्यानंतर फोरमचे सदस्य आपल्या कुटुंबीयांसमवेत दिवाळी साजरी करत आहेत.
फोरमचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद गायकवाड यांनी फेसबुकवर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दिवाळीसाठी भेटवस्तू देण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत कराड (जि. सातारा) येथून सचिन पाटील यांनी अ‍ॅमेझॉनवरून काही खेळणी पाठवली. नाशिकचे डॉ. समीर पवार, डॉ. विशाल पवार, डॉ. सारिका देवरे यांनी वह्या-पुस्तकं, ड्रॉइंगबुक्स, कलर बॉक्स, स्केच पेन्स हे शैक्षणिक साहित्य भेट दिलं. दिनेश जोशी, प्रा. डॉ. आशिष चौरसिया, बाबाराव बिहाडे यांनी फराळाचे पदार्थही आणि मिठाई आणून दिली. याशिवाय अनेक फेसबुक मित्रांनी कपडे आणि खेळणी पाठवली.(वार्ताहर)


 

Web Title: Diwali with Peth tribal students