Division of Lasalgaon market | लासलगावी बाजारतळाची विभागणी

लासलगावी बाजारतळाची विभागणी

ठळक मुद्देभाजीपाला विक्रीसाठी बाजारतळाची विभागणी

लासलगाव : निफाड तालुक्यात कोरोनाने पुन्हा एकदा डोके वर काढल्याने आरोग्य व प्रशासकीय यंत्रणा गतिमान झाली असून, बुधवारी (दि.७) बाजारपेठांमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला. लासलगाव बाजार समिती आवारातही कोरोना प्रतिबंधक उपाययोजना करीत लिलाव सुरू होते.

दरम्यान, भाजीपाला विक्रीसाठी बाजारतळाची विभागणी करण्यात आली. निफाड तालुक्यात नवीन २२९ कोरोना बाधित रुग्ण आढळून आले असून, आता युवावर्गासही त्याची लागण होताना दिसून येत आहे. आतापर्यंत तालुक्यात कोरोनामुळे २१४ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती निफाड तालुका कोरोना संपर्क अधिकारी डॉ. चेतन काळे यांनी दिली. तालुक्यात आतापर्यंत ८,१९६ बाधित झाले तर ६,०२४ रुग्ण बरे होऊन घरी परतले. सद्यस्थितीत १९५८ रुग्ण उपचार घेत आहेत. दरम्यान, लासलगावचे सरपंच जयदत्त होळकर, ज्येष्ठ सदस्य नानासाहेब पाटील, उपसरपंच अफजलभाई शेख यांनी लासलगाव परिसरातील रुग्णांची संख्या व उपाययोजना यावर चर्चा केली. गर्दी होणाऱ्या बाजारतळातील भाजीपाला विक्रीची विभागणी करून लासलगाव रेल्वेस्थानक रस्त्यावर दुसऱ्या ठिकाणी भाजीपाला विक्री सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला.

Web Title: Division of Lasalgaon market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.