शहरं
Join us  
Trending Stories
1
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
2
बापरे! बेन स्टोक्सचा चेहरा सर्जरीनंतर पूर्णच बदलून गेला, पहिली झलक पाहताच फॅन्सना बसेल धक्का
3
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
4
“अरविंद केजरीवाल महिलाविरोधी, PM मोदींवरील विश्वासामुळेच भाजपासोबत”: स्वाती मालीवाल
5
इस्लामाबादमध्ये युद्धाचा फैसला! ट्रम्प यांचे दूत अन् इराणचे मंत्री आमनेसामने; जगात शांतता प्रस्थापित होणार?
6
"माझ्या कानाखाली मारण्याच्या मुद्द्यावरून हरभजनने १ कोटी कमावले"; श्रीसंतचा गंभीर आरोप
7
Rohit Pawar : "शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला,अन्यथा..."; रोहित पवार आक्रमक
8
"आता हा दिग्दर्शन करणार, बघू काय दिवे लावतो...", रितेशने सांगितली दिग्दर्शनाच्या निर्णयामागची गोष्ट
9
"ते फोटो पूर्णपणे खोटे", आपचा भाजपावर पलटवार; आतिशी आणि संजय सिंह यांचं थेट आव्हान
10
“छत्रपती शिवाजी महाराज अन् रामदास स्वामींचा कालखंड वेगळा, संदर्भ जोडू नका”: हर्षवर्धन सपकाळ
11
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
12
ई-कॉमर्सच्या युगात व्हा 'डिजिटल दुकानदार'; संपूर्ण देश बनू शकतो तुमचा ग्राहक! 'असे' बनू शकता Amazon-Flipkart वर सेलर
13
प्रेग्नंसी फोटो शेअर करत सुप्रिया पिळगावकरांनी दिला आठवणींना उजाळा, म्हणाल्या...
14
RBI च्या मोठ्या झटक्यानंतर Paytm च्या शेअरचं काय होणार? ब्रोकरेनं दिलं अवाक् करणारं टार्गेट
15
पंजाब, दिल्ली ते गुजरात; आम आदमी पक्ष फुटल्याने भाजपाचा दुहेरी फायदा, कशी बदलली समीकरणे?
16
दागिन्यांसाठी सुनेचा फिल्मी ड्रामा; स्वत:च्या घरात रचला दरोड्याचा बनाव, पण ४ तासांत पर्दाफाश
17
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
18
सहकुटुंब सहपरिवार अनुभवता येणार छत्रपती शिवरायांचा पराक्रम; रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाला U/A प्रमाणपत्र
19
युद्धाचा फटका: रासायनिक खतांची दरवाढ शेतकऱ्यांच्या बोकांडी, दरात १०.८४ ते ८५.७१ टक्क्यांची वाढ
20
अष्टपैलू क्रिकेटपटूवर दोन वर्षांची बंदी; कोकेन सेवन केल्याचे ड्रग्ज टेस्टमध्ये झाले निष्पन्न
Daily Top 2Weekly Top 5

धोंडेगावचे विभाजन, इंदिरानगर नवीन ग्रामपंचायतीस मान्यता’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2016 23:09 IST

‘धोंडेगाव ग्रामपंचायत विसर्जित, लवकरच निवडणुका

नाशिक : तालुक्यातील धोंडेगाव या गु्रप ग्रामपंचायतीतून इंदिरानगर (गाळोशी) या नवीन ग्रामपंचायतीची स्थापना करण्यास राज्य सरकारने मान्यता दिल्याची माहिती गटविकास अधिकारी रवींद्रसिंह परदेशी यांनी दिली. यासंदर्भात अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली असून, आता नाशिक तालुक्यात एकूण ६५ ग्रामपंचायती झाल्याचे परदेशी यांनी सांगितले.धोंडेगाव ग्रामपंचायतीने ३० जून २०१४ रोजी विशेष ग्रामसभा घेऊन धोंडेगाव महसुली गावाची लोकसंख्या २२३६, कश्यपनगर महसुली गावाची लोकसंख्या ८७९ व इंदिरानगर या महसुली गावची लोकसंख्या १८३४ अशी एकूण ५००६ लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतीमधून धोंडेगाव व कश्यपनगर अशी एक ग्रामपंचायत व इंदिरानगर या महसुली गावासाठी स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापन होण्याबाबतचा ठराव केला होता. तसा ठराव पंचायत समितीला प्राप्त झाला होता. पंचायत समितीचे विस्तार अधिकारी मनोहर तरवारे व संजय पवार तसेच सहायक गटविकास अधिकारी स्मिता गुजराथी यांनी ठरावाची पडताळणी करून हा ठराव नियमानुसार असल्याने धोंडेगावमधून इंदिरानगर ही स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापन करण्याबाबत शिफारस केली होती. त्यानुसार पंचायत समितीने सविस्तर प्रस्ताव तयार करून तो जिल्हा परिषदेला सादर केला होता. त्यासाठी सभापती मंदाकिनी निकम व उपसभापती अनिल ढिकले यांनी याबाबत जिल्हा परिषदेकडे पाठपुरावा केला. त्यावर अध्यक्ष विजयश्री चुंभळे व तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर व विद्यमान मिलिंद शंभरकर यांनी विभागीय आयुक्त कार्यालयाकडे याबाबतचा प्रस्ताव सादर केला होता. हा प्रस्ताव पुढे शासनाला सादर करण्यात आला होता. आता या प्रस्तावास मान्यता मिळाली असून, तालुक्यातील एकूण ६४ असलेल्या ग्रामपंचायती इंदिरानगर नवीन ग्रामपंचायत झाल्याने संख्या ६५ इतकी झाली आहे. इतकेच नव्हे तर लाडची या ग्रामपंचायतीतून साडगाव ग्रामपंचायत स्थापनेचाही प्रस्ताव शासनाला पाठविला असून लवकरच त्याबाबतही कार्यवाही होणार असल्याचे गटविकास अधिकारी रवींद्रसिंह परदेशी यांनी सांगितले. (प्रतिनिधी)ओझर टाउनशिप येथे युवकाची आत्महत्त्याओझरटाउनशिप : ओझर येथील गणेशनगरमधील युवकाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्त्या केली.गुरुवारी पहाटेच्या सुमारास दिनेश मनोहर गायकवाड (३५)याने राहत्या घरात बेडरूममधील पंख्याच्या हुकला दोरी बांधून गळफास घेऊन अत्महत्त्या केली. घटनेचे वृत्त समजताच पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करून गायकवाड याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पिंपळगाव रुग्णालयात पाठविला. आत्महत्त्येचे कारण समजू शकलेले नाही.या संदर्भात ओझर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून, अधिक तपास ओझर पोलीस करीत आहेत.(वार्ताहर)