सिडकोतील रणगाड्यालाच खाडा, मनपाची उदासिनता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2019 13:34 IST2019-10-31T13:32:50+5:302019-10-31T13:34:59+5:30
नाशिक - महापालिकेच्या वतीने सिडकोतील लेखा नगर येथे लष्कराने वापरलेला रणगाडा उभारण्याची तयारी करण्यात आली होती. त्यासाठी आवश्यक ते ...

सिडकोतील रणगाड्यालाच खाडा, मनपाची उदासिनता
नाशिक- महापालिकेच्या वतीने सिडकोतील लेखा नगर येथे लष्कराने वापरलेला रणगाडा उभारण्याची तयारी करण्यात आली होती. त्यासाठी आवश्यक ते शुल्क महापालिकेने भरले होते. मात्र गेल्या आठ महिन्यात त्यावर कोणत्याही प्रकाराची कारवाई झाली नसल्याने प्रशासनाने रणगाड्यावर खाडा मारला की काय अशी शंका उपस्थित केला जात आहे.
नाशिक महापालिकेच्या वतीने सीएसआर अंतर्गत शहरातील विविध भागातील चौकांचे सुशोभिकरण करण्यात येत आहे. त्याअंतर्गतच महपाालिकेने लेखा नगर येथे एका प्रायोजकामार्फत रणगाडा बसविण्याचे ठरवले होते. त्यासाठी आवश्यक त्या परवानग्या मिळाल्या होत्या संरक्षण खात्याने रणगाडा देण्याची तयारी दर्शविल्यानंतर महापालिकेने चौकात काम देखील सुरू केले होते. मात्र गेल्या आठ ते नऊ महिन्यापासून हे काम बंद पडले आहे. यासंदर्भात परीसराचे नगरसेवक प्रविण तिदमे यांनी महापालिकेला पत्र दिले असून या प्रकाराबाबत नाराजी व्यक्त केली आहे.
लेखा नगर येथे भारतीय सैन्याच्या शौर्याचे प्रतिक म्हणून हा रणगाडा उभारण्यात येणार होता. त्यासाठी महापालिकेने संरक्षण खात्याकडे आवश्यक ते शुल्क भरले असून देखील गेल्या ९ महिन्यापासून काम ठप्प असल्याची तक्रार नगरसेवक प्रविण तिदमे यांनी केली आहे. कामात दिरंगाई करणाऱ्यांवर कारवाई करावी आणि आठ दिवसात काम सुरू करावे अन्यथा जनआंदोलन उभारण्यात येईल असा इशारा त्यांंनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनात केला आहे.