शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

मराठा मोर्चासाठी जिल्हाभर एल्गार

By admin | Updated: September 21, 2016 23:57 IST

देवळा, खामखेड्यात मोटारसायकल रॅली : ठिकठिकाणी बैठकांचे आयोजन

नाशिक : कोपर्डीतील अल्पवयीन मुलीवर झालेल्या बलात्कार प्रकरणाच्या निषेधार्थ नाशिकमध्ये शनिवारी (दि. २४) काढण्यात येणाऱ्या मराठा क्रांती मूकमोर्चाच्या प्रचार- प्रसारासाठी जिल्ह्यात मोटारसायकल रॅलींबरोबरच ठिकठिकाणी बैठकांचे आयोजन करण्यात येत आहे. खामखेडा येथे रॅलीचे स्वागतखामखेडा : नाशिक येथे काढण्यात येणाऱ्या मराठा क्रांती मूकमोर्चाला देवळा तालुक्यातून मराठा समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे यासाठी मोर्चाच्या जनजागृतीसाठी संपूर्ण देवळा तालुकाभर निघालेल्या मोटारसायकल रॅलीचे खामखेडा येथे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. नाशिक येथे निघणाऱ्या मूकमोर्चात कोपर्डी येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला फाशी द्यावी, या घटनेचा निषेध नोंदविण्यासाठी, अ‍ॅट्रॉसिटी कायदा रद्द करण्यासाठी, मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे आदि मागण्यांसाठी नाशिक येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर मराठा समाजाचा मूकमार्चा नेण्यात येणार आहे. या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होण्यासाठी या मोर्चाची संपूर्ण वाडी-वस्तीवर जनजागृती होऊन तालुक्यातील समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे म्हणून मोटार-सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. रॅलीत असंख्य दुचाकीस्वार सहभागी झाले होते. देवळा तालुक्यात रॅलीमध्ये युवकांचा सहभाग लक्षणीयदेवळा : नाशिक येथे आयोजित मराठा क्रांती मूकमोर्चासाठी देवळा तालुक्यात जोरदार तयारी करण्यात येत असून, तालुक्यातून मोटारसायकल रॅली काढून जनजागृती करण्यात आली. बुधवारी सकाळी ९ वाजता देवळ्याचे ग्रामदैवत दुर्गामाता मंदिरापासून रॅलीस प्रारंभ झाला. श्रीमती जनाबाई अहेर यांच्या हस्ते झेंडा दाखवून रॅलीचा शुभारंभ करण्यात आला. त्याआधी उरी येथे अतिरेकी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. देवळा येथून सुरू झालेली ही रॅली मटाणे, वरवंडी, भऊर, विठेवाडी, सावकी, लोहोणेर, खालप, वासूळ, महालपाटणे, निंबोळा, डोंगरगाव, मेशी, खडकतळे, पिंपळगाव, दहिवड, वाखारी, वाखारवाडी, खुंटेवाडी, गुंजाळनगर, रामेश्वर, मकरंदवाडी, कापशी, भावडे, वडाळे, कणकापूर, शेरी वार्शी, खर्डा, वाजगाव व शेवटी देवळा येथे रॅलीचा समारोप करण्यात आला. रॅलीच्या प्रारंभी बाजार समितीचे संचालक योगेश अहेर यांनी मोटारसायकल चालकांना व सहभागी युवकांना शिस्तीचे पालन करावे व रॅली शांततेत पार पाडावी, असे आवाहन केले. देवळा तालुक्यात मोटारसायकल रॅली काढून गावागावात मराठी समाजबांधवांनी मोर्चात सहभाग घ्यावा यासाठी जनजागृती मोहीम राबवून तालुका पिंजून काढण्यात आला.नाशिक येथे मोर्चासाठी देवळा येथून सकाळी साडेसात वाजता शिवाजी पुतळ्यापासून मार्गस्थ होण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. (लोकमत चमू)देवळा तालुक्यात बैठकांचे नियोजनदेवळा : गावागावातून वाहनांची व्यवस्था करणे,मोर्चा संबंधित होर्डिंग्ज लावणे,मोर्चात सहभागी होणार्या सर्वांनी पाळावयाच्या नियमांची माहिती देणे,आर्थिक नियोजन करणे आदि कामांची जबाबदारीचे नियोजन करण्यात आले असुन देवळा नगरपंचायतीच्या नगरसेवकांना त्यांच्या प्रभागाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. नाशिक येथील मुक मोर्चा शिस्तीने व शांततेने पार पाडावा,पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आपआपल्या वाहनात करावी,पाण्याच्या रिकाम्या बाटल्या फेकू नये,पान तंबाखु खाउन थुंकुन अस्वच्छता करु नये असे आवाहन आयोजकांनी केले आहे. सोशल मिडियातून मोर्चा संदर्भात सतत ताज्या घडामोडी प्रसिद्ध केल्या जात आहेत. ह्या मोर्चाला तालुक्यातील इतर समाजबांधवांचा पाठींबा मिळत आहे.तालुक्यातील मुस्लिम समाजबांधव , तसेच जैन ,लाडशाखीय वाणी आदी समाजबांधवांनी मुक मोर्चास पाठींबा दिला आहे. देवळा मर्चंटस को आॅप.बँकेने मराठा क्र ांती मोर्चाच्या दिवशी म्हणजे दि.24 सप्टेंबर रोजी होणारी नियोजित वार्षिक सर्वसाधारण सभा पुढे ढकलुन ती आता २६ सप्टेंबर रोजी घेण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला असुन मोर्चास त्यांनी पाठिंबा दिला आहे.ह्या मोर्चासाठी आपले अंतर्गत मतभेद दूर ठेवून तालुक्यातील सर्विपक्षय नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते, मराठी युवक नागरीक स्वयंस्फुर्तीने सहभागी होत आहेत. मोटारसायकल र?लीप्रसंगी नगरसेवक जितेंद्र अहेर ,लक्ष्मीकांत अहेर ,संभाजी अहेर ,उपसरपंच भाउसाहेब पगार ,शिवमुद्रा गृपचे अध्यक्ष रजत अहेर ,मोरया प्रतिष्ठाणचे अध्यक्ष उमेश अहेर ,शिवसेनेचे अशोक अहेर ,शिवराजे मित्रमंडळाचे अध्यक्ष किरण अहेर ,छावा संघटनेचे तालुकाध्यक्ष आण्णा अहेर,विजय शिंदे ,संतोष शिंदे ,देवा भामरे ,राजेश अहेर ,दिलिप अहेर ,दिनकर अहेर ,बालू सुर्यवंशी,आभिजित शिंदे,सतिश सुर्यवंशी,शरद खैरणार,काकाजी शिंदे,मिलेश निकम आदिंसह कार्यकर्ते व नागरीक उपस्थित होते. जिल्ह्यातील बाजार समित्या राहणार बंदपिंपळगाव बसवंत/लासलगाव : नाशिक येथे होणाऱ्या मराठा क्रांती मोर्चासाठी शेतकरी बांधवांना मोर्चात सहभागी व्हावयाचे असल्याने शेतकऱ्यांच्या विनंतीवरून शनिवारी (दि. २४) संपूर्ण दिवस पिंपळगाव बसवंतसह जिल्ह्यातील बाजार समित्या बंद राहणार आहेत. कृषी उत्पन्न बाजार समितीचे कामकाज, खरेदी-विक्र ी आदि व्यवहार बंद राहणार असल्याची माहिती बाजार समितीचे सभापती दिलीप बनकर यांनी दिली.सदर मोर्चास नाशिक जिल्ह्यातील विविध तालुके, गावे, परिसर व भागामधून लाखो मराठा समाज उपस्थित राहणार आहे. सदर समाज बांधवांना मोर्चास उपस्थित राहता यावे याकरिता शेतकरी बांधवांच्या विनंतीवरून तसेच संपूर्ण दिवसभर नाशिक जिल्ह्याच्या विविध भागातून मोर्चकरी वाहनांची ये-जा होणार आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी निर्माण होणार आहे.इतर जिल्ह्यातून येणारे मालवाहतूक ट्रक, कंटेनर आदिंचे मार्ग बदलण्यात येणार आहे किंवा वाहतूक बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनी काढलेला शेतमालाचे नुकसान होण्याची शक्यता असल्याने व शेतमालाची वाहतूक करता येणार नाही. बाजार समितीचे सर्व संबंधित घटक, व्यापारी, आडते, हमाल-मापारी, कर्मचारी आदिंनाही मोर्चात सहभागी व्हावयाचे आहे. पिंपळगाव बसवंत शहर संपूर्णपणे बंद राहणार असल्याचेही बनकर यांनी सांगितले.