्रजिल्हा परिषद शिक्षिकेने केली शासनाची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2018 00:29 IST2018-02-14T00:26:15+5:302018-02-14T00:29:07+5:30
नाशिक : अपंग लोकसेवकांना सोयीच्या ठिकाणी बदली देण्याबाबतच्या शासनाच्या आदेशाचा फायदा घेण्यासाठी जिल्हा परिषद शाळेतील शिक्षिकेने चक्क बनावट अपंगत्वाचे प्रमाणपत्र सादर करून शासनाची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे़ या प्रकरणी वैशाली सुधाकर सोनवणे या शिक्षिकेविरोधात सरकारवाडा पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

्रजिल्हा परिषद शिक्षिकेने केली शासनाची फसवणूक
नाशिक : अपंग लोकसेवकांना सोयीच्या ठिकाणी बदली देण्याबाबतच्या शासनाच्या आदेशाचा फायदा घेण्यासाठी जिल्हा परिषद शाळेतील शिक्षिकेने चक्क बनावट अपंगत्वाचे प्रमाणपत्र सादर करून शासनाची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे़ या प्रकरणी वैशाली सुधाकर सोनवणे या शिक्षिकेविरोधात सरकारवाडा पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
नाशिक पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी किरण जयप्रकाश कुवर (४६, रा. अनमोल नयनतारा सिटी, तिडके कॉलनी, नाशिक) यांनी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार, नाशिक तालुक्यातील मुंगसरे जिल्हा परिषद शाळेत वैशाली सुधाकर सोनवणे (रा. नाशिक) या शिक्षिका आहेत.
त्यांनी सन २०१७ -१८ दरम्यान शासनाच्या जिल्ह्णांतर्गत बदलीसाठी आॅनलाइन अर्ज केला होता. अपंग लोकसेवकांना सोयीच्या ठिकाणी बदली देण्याबाबत शासनाचे निर्देश असल्याने याचा फायदा घेण्यासाठी शिक्षिका सोनवणे यांनी जळगाव जिल्हा रुग्णालयाच्या जिल्हा शल्यचिकित्सकांकडील अपंगत्वाचे बनावट प्रमाणपत्र बनवून घेतले व ते जिल्ह्णांतर्गत बदलीसाठी आॅनलाइन अर्जाद्वारे शासनास सादर केले. पंचायत समितीने सोनवणे यांनी केलेल्या आॅनलाइन अर्जातील कागदपत्रांची तपासणी केल्यानंतर अपंगत्वाचे प्रमाणपत्र हे बनावट असल्याचे समोर आले़ त्यामुळे गटशिक्षण अधिकारी कुंवर यांनी सरकारवाडा पोलीस ठाण्यात सोनवणे यांच्या विरोधात फसवणुकीची फिर्याद दिली आहे.