शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
2
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
3
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
4
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
5
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
6
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
7
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
8
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
9
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
10
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
11
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
12
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
13
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
14
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
15
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
16
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
17
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
18
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
19
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
20
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा बॅँक अध्यक्षांवर अविश्वास?

By admin | Updated: September 10, 2016 01:38 IST

तातडीच्या बैठकीत इशारा : राजीनामा देण्याची सूचना

गणेश धुरी नाशिकगेल्या वर्षी जून महिन्यात अध्यक्ष-उपाध्यक्षांची वर्षभरासाठी झालेली निवड आणि त्याअनुषंगाने राजीनामा देण्यास ‘राजी’ नसलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेचे अध्यक्ष नरेंद्र दराडे यांच्यावर अविश्वास आणण्याचा बहुमुखी निर्णय शुक्रवारी (दि. ९) रात्री झालेल्या बैठकीत घेण्यात आल्याचे वृत्त आहे.एकोप्याने दोेन्ही गटाचा अध्यक्ष केले असून, समजुतदारीने राजीनामा द्या, असा सल्ला ज्येष्ठ संचालकांनी दिला, तर राजीनामा न दिल्यास अविश्वासाला सामोरे जाण्याचा इच्छुक संचालकांनी दिलेला इशाराच बैठकीचा नूर पालटून गेला. शहराच्या मध्यवर्ती चांडक सर्कल लगत असलेल्या एका तारांकित हॉटेलमध्ये शुक्रवारी रात्री जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या संचालक मंडळाची अनौपचारिक बैठक बोलविण्यात आली होती. बैठक बोलविण्यामागे जिल्हा बॅँकेचेच एक ज्येष्ठ व माजी आमदार असलेल्या एका संचालकाची महत्त्वाची भूमिका होती; मात्र ऐनवेळी या माजी आमदाराच्या घरातील नातलग अचानक आजारी पडल्याने या संचालकाला मुंबईला घाईगर्दीत जावे लागले. जिल्हा बॅँकेच्या या अनौपचारिक बैठकीस २१ पैकी १७ संचालक जातीने हजर होते. विद्यमान आमदार असलेल्या एका तातडीने सर्व संचालकांना जिल्हा बॅँकेसंदर्भात महत्त्वाचा निर्णय घेण्यासाठी तातडीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आल्याचा सांगावा धाडला. पाठोपाठ बहुसंख्य संचालक या चांडक सर्कल परिसरात असलेल्या हॉटेलमध्ये जमा झाले. वर्षभरासाठी अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची निवडणूक असल्याने तुमचा कार्यकाळ झाला आहे, तुम्ही राजीनामा द्या, असे एका इच्छुक संचालकाने सांगितल्यावर ‘बघू, काही तरी निर्णय घेऊ, करतो, सांगतो,’ असे थातुरमातुर उत्तर आल्याने मग एका आमदार संचालकाने आम्हाला अविश्वास ठराव आणण्यास मजबूर करू नका, असा निर्वाणीचा इशारा दिल्याने बैठकीचे वातावरण तापले. अखेर माजी आमदार असलेल्या एका ज्येष्ठ संचालकाने ‘आपण इतके दिवस एकोप्याने कामकाज केले, त्यामुळे अविश्वास नको, सामोपचाराने खांदेपालट करा’ असा सल्ला दिल्याचे समजते. या बैठकीस एका माजी आमदारासह एक माजी अध्यक्ष व दोघे पहिल्यांदाच निवडून आलेले संचालक वगळता १७ संचालक उपस्थित होते.