अतिदुर्गम भागातील विद्यार्थ्यांना स्वेटर वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2020 18:40 IST2020-12-23T18:39:35+5:302020-12-23T18:40:42+5:30

दिडोरी : तालुक्यातील अतिदुर्गम भागातील सावरपाडा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना युवा सेनेच्या वतीने स्वेटर वाटप करण्यात आले. जिल्हा परिषदेच्या सावरपाडा येथील प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना स्वेटर वाटप युवा सेनेचे आदित्य केळकर यांच्या उपस्थितीत करण्यात आले.

Distribution of sweaters to students in remote areas | अतिदुर्गम भागातील विद्यार्थ्यांना स्वेटर वाटप

जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सावरपाडा येथे शालेय विद्यार्थीना स्वेटर वाटप करतांना निलेश गवळी, आदित्य केळकर, सुरेश डोखळे आदी पदाधिकारी.

ठळक मुद्दे दिंडीरी, पेठ, कळवण या तालुक्यातील गरजू विद्यार्थांना स्वेटर वाटप

दिडोरी : तालुक्यातील अतिदुर्गम भागातील सावरपाडा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना युवा सेनेच्या वतीने स्वेटर वाटप करण्यात आले. जिल्हा परिषदेच्या सावरपाडा येथील प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना स्वेटर वाटप युवा सेनेचे आदित्य केळकर यांच्या उपस्थितीत करण्यात आले.

युवासेनेच्या वतीने, दिंडीरी, पेठ, कळवण या तालुक्यातील गरजू विद्यार्थांना स्वेटर वाटप करण्यात आले असून, यापुढेही अनेक सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार आहे.

यावेळी निलेश गवळी, सुरेश डोखळे, कारभारी आहेर व पुंडलिक महाले यांनी मनोगत व्यक्त केले. या प्रसंगी, युवा सेनेचे निलेश शिंदे, मोहन कामडी, किरण भुसार, मुन्ना हिरे, शाम वाघमारे व सुनील पगार उपस्थित होते.
 
Web Title: Distribution of sweaters to students in remote areas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.