Distribution of sarees to women in Raigadnagar | रायगडनगर येथील महिलांना साड्यांचे वाटप

रायगडनगर येथील महिलांना साड्यांचे वाटप

ठळक मुद्दे डॉ.प्रियंका मुटकुळे यांनी मार्गदर्शन केले.

इगतपुरी : महिला दिनानिमित्ताने युनायटेड स्टँड फाउंडेशन युनायटेड वी स्टँड फाउंडेशनच्या वतीने रायगडनगर आणि चिमनबारी येथील महिलांना साड्या, सॅनिटरी पॅडचे वाटप करण्यात आले.

सॅनिटरी पॅडबद्दल जागरूकता निर्माण व्हावी, या उद्देशाने डॉ.प्रियंका मुटकुळे यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमास साक्षी फुगे, हर्षाली देवरे, धनश्री बोरसे, महेक पांडे, आकांक्षा लाकाडे, रश्मी बैरागी, ऐश्वर्या नागरे, देवयानी पाटील सर्व सदस्यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाला महाराष्ट्र आदिवासी विकास परिषदेचे महाराष्ट्र युवाप्रमुख लकी जाधव, रायगडनगर सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन ॲड. हनी नारायणी यांनी केले. (०९ महिला दिन)

Web Title: Distribution of sarees to women in Raigadnagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.