नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना ७ कोटी रुपयांचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2020 09:59 PM2020-12-20T21:59:15+5:302020-12-21T00:03:38+5:30

घोटी : इगतपुरी तालुक्यातील भात उत्पादक शेतकऱ्यावर कधी करपा रोगाने तर कधी अवकाळी पावसाने हैराण करून सोडले होते. आलेल्या अस्मानी संकटांना तोंड देत शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास हिरावरून नेला, काहींचा मातीमोल झाला. अशा परिस्थितीत विविध संकटांचा सामना करत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी या करिता सर्व स्तरातून मागणी होत होती.

Distribution of Rs. 7 crore to the affected farmers | नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना ७ कोटी रुपयांचे वाटप

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना ७ कोटी रुपयांचे वाटप

Next
ठळक मुद्देइगतपुरी : तालुक्यातील प्रशाकीय स्तरावरून १६ कोटींची मागणी

घोटी : इगतपुरी तालुक्यातील भात उत्पादक शेतकऱ्यावर कधी करपा रोगाने तर कधी अवकाळी पावसाने हैराण करून सोडले होते. आलेल्या अस्मानी संकटांना तोंड देत शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास हिरावरून नेला, काहींचा मातीमोल झाला. अशा परिस्थितीत विविध संकटांचा सामना करत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी या करिता सर्व स्तरातून मागणी होत होती.

प्रशासकीय यंत्रणेकडून काही शेतकऱ्यांना टप्या टप्याने नुकसान भरपाई वितरित होत असल्याने आणि उर्वरित शेतकऱ्यांना भरपाई मिळणार असल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
इगतपुरी तालुक्यात अवकाळी पावसाने व विविध संकटानी १२६ गावांना नुकसानाचा सामना करावा लागला आहे. तालुक्यातील नुकसानग्रस्त क्षेत्र हे १६२०८ हेक्टर असे आहे. सदर नुकसानीचे पंचनामे करून तीन महसूली कार्यालया मार्फत १६ कोटी २० लाख ८१ हजार रुपये नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी प्रशासकीय पातळीवर करण्यात आली होती. त्यापैकी ७ कोटी च्या वर रक्कम तहसीलदार कार्यालयामार्फत वाटप करण्यात आले आहे. उर्वरित रक्कम त्वरित देण्यात यावी अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
याआधीचे एक पीक हातातुन गेले असल्याने पुढील पिकासाठी मशागतीसाठी पैसा नसल्याने शेतकरी राजा हवालदील झाला आहे. बळीराजाला नवसंजीवनी देण्यासाठी प्रशासकीय पातळीवर लवकरात लवकर भरपाई मिळावी अशी मागणी होत आहे. शेतीच्या मशागतीला लागणारा खर्च आणावा कुठून असे संकट शेतकऱ्यासमोर समोर उभे ठाकले आहे, त्यामुळे लवकरात लवकर उर्वरित नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या वतीने होत आहे.
इगतपुरी तालुक्यातील नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना त्यांची भरपाई देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. प्रशासकीय पातळीवर नुकसान भरपाईची मागणी होत असून उर्वरीत नुकसानग्रस्थाना लवकरच भरपाई मिळणार आहे.
कार्यालयाने काटेकोरपणे नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांची यादी शासनाकडे सादर केली असून नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे ३ महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी बांधावर जाऊन केले आहे. तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायक यांच्या संयुक्त भेटीद्वारे शेतकऱ्यांच्या समक्ष नुकसानीचे पंचनामे केले आहेत. लवकरच भरपाई संपूर्ण शेतकऱ्यांना मिळेल याकरिता प्रयत्नशील आहोत.

- शितलकुमार तवर, तालुका कृषी अधिकारी, इगतपुरी.

Web Title: Distribution of Rs. 7 crore to the affected farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.