मृत पोलिसांच्या वारसांना धनादेश वाटप

By नामदेव भोर | Updated: June 20, 2023 15:25 IST2023-06-20T15:24:50+5:302023-06-20T15:25:25+5:30

नाशिक : शहर पोलिस दलातील मयत पोलिस अंमलदारांच्या वारसांना पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांच्या हस्ते सोमवारी (दि. १९) प्रत्येकी ...

Distribution of checks to heirs of deceased policemen | मृत पोलिसांच्या वारसांना धनादेश वाटप

मृत पोलिसांच्या वारसांना धनादेश वाटप

नाशिक: शहर पोलिस दलातील मयत पोलिस अंमलदारांच्या वारसांना पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांच्या हस्ते सोमवारी (दि. १९) प्रत्येकी १० लाख रुपयांचे धनादेश वितरित कण्यात आले. यावेळी मुख्यालय पोलिस उपायुक्त मोनिका राऊत, सहायक पोलिस आयुक्त डॉ. सीताराम कोल्हे, बँक अधिकारी दिनेश निचीत, अंकित मालविया आदी उपस्थित होते.

नाशिक शहर पोलिस दलातील नैसर्गिकरीत्या मयत झालेले वाहतूक शाखेतील पोलिस हवालदार राजाराम गांगुर्डे यांचे २३ नोव्हेंबर २०२२ रोजी हृदयविकाराने मृत्यू झाला होता. तर भद्रकाली पोलिस ठाण्यातील पोलिस अंमलदार अनुज मोरे यांचे ११ फेब्रुवारी २०२२ रोजी यकृताच्या आजाराने निधन झाले होते. या दोनही अंमलदारांचे वारस सुनीता राजाराम गांगुर्डे व मीना अरुण मोरे यांना पोलिस आयुक्त, नाशिक शहर यांच्या हस्ते प्रत्येकी १० लाख रुपयांचा धनादेश प्रदान करण्यात आला.

Web Title: Distribution of checks to heirs of deceased policemen