निर्मला पुरस्काराचे वितरण ; ‘निर्मलाचा वाटसरू’ पुस्तकाचे प्रकाशन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2018 00:47 IST2018-11-26T00:47:45+5:302018-11-26T00:47:59+5:30
के. जे. मेहता हायस्कूलमध्ये निर्मला लोककल्याण प्रबोधिनीच्या ‘निर्मलाचा वाटसरू’ या पुस्तकाचे प्रकाशन आणि निर्मला पुरस्काराचे वितरण उत्साहात झाले. आमदार बाळासाहेब सानप यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण झाले.

निर्मला पुरस्काराचे वितरण ; ‘निर्मलाचा वाटसरू’ पुस्तकाचे प्रकाशन
नाशिकरोड : के. जे. मेहता हायस्कूलमध्ये निर्मला लोककल्याण प्रबोधिनीच्या ‘निर्मलाचा वाटसरू’ या पुस्तकाचे प्रकाशन आणि निर्मला पुरस्काराचे वितरण उत्साहात झाले. आमदार बाळासाहेब सानप यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण झाले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सीएचएमईएसचे सचिव दिलीप बेलगावकर, निर्मला प्रबोधिनीचे संस्थापक अध्यक्ष ज्ञानेश्वर देवरे, उपाध्यक्ष सरोज दायमा, साने गुरु जी शिक्षण संस्थेचे सचिव प्रवीण जोशी, शरद पाटील, उदय शेवतेकर, ज्योत्स्ना डुंबरे, प्रशांत बिर्ला, ए. एम. तांबोळी, बाळकृष्ण शेट्टी यांची उपस्थिती होती.
यावेळी सानप म्हणाले की, समाजकार्य करताना टीका, हेटाळणी होतच असते. मात्र, जिद्द, निष्ठेने जो समाजसेवा करतो त्याला जनतेची साथ मिळते. ज्ञानेश्वर देवरे यांच्याविषयी विविध मान्यवरांनी लिहिलेल्या ‘निर्मलाचा वाटसरू’ या पुस्तकाचे प्रकाशन यावेळी झाले. देवरे यांनी मनोगत व्यक्त केले. सुभाष टिळे यांनी सूत्रसंचालन केले. ए. एस. तांबोळी यांनी आभार मानले. प्रेस मजदूर संघाचे सरचिटणीस जगदीश गोडसे (कामगार चळवळ), डॉ. भाऊसाहेब मोरे (अवयवदान चळवळ), आनंदा गांगुर्डे (क्रीडा),
हेमलताताई बिडकर (डांगसेवा मंडळ), प्रवीण जोशी (साने गुरु जी शिक्षण प्रसारक मंडळ) यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
अपेक्षा आहिरे, आशा जाधव, कबीरभाई शेख, अतुल चौधरी आदींनी संयोजन केले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.