शहरं
Join us  
Trending Stories
1
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
2
Latest Marathi News LIVE Updates: केंद्रीय कायदामंत्र्यांनी लोकसभेत सादर केले सीमांकन विधेयक; संसदेत गदारोळ
3
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
4
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
5
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
6
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
7
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
8
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
9
१७३ वर्षांपूर्वी प्रथम धावली, ४०० जणांचा प्रवास; आजही सेवेत, भारतीय रेल्वेची ‘ती’ ट्रेन कोणती?
10
विराट कोहली सामना संपल्यावर स्वत:हून LSGचे मालक संजीव गोयंकांना भेटायला गेला, फोटो VIRAL
11
अक्षय्य तृतीयेपूर्वीच सोन्या-चांदीच्या दरात सातत्यानं तेजी; पाहा काय आहेत २४k, 22k, 18k सोन्याचा लेटेस्ट भाव
12
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
13
'प्रताप सरनाईक माझे ड्रायव्हर असते'; मेहतांच्या विधानाने वाद, सरनाईक म्हणाले, "दुर्लक्ष करतोय पण..."
14
स्टार क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा! महिला अत्याचाराच्या आरोपाखाली जाऊन आलाय तुरुंगात
15
करण-तेजस्वीचं झालंय 'सीक्रेट वेडिंग?' सोशल मीडियावर चर्चा; अखेर अभिनेत्याने सोडलं मौन
16
Middle East Conflict: अमेरिकेचा कठोर निर्णय! जागतिक तेल पुरवठा विस्कळीत होण्याची भीती, भारतासाठीही धोक्याची घंटा
17
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
18
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
19
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
20
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात, Sensex ४०० अंकांनी तर Nifty मध्ये १५० अंकांची तेजी, 'या' शेअर्समध्ये तेजी
Daily Top 2Weekly Top 5

उमेदवारांकडून कामे वाटप

By admin | Updated: February 21, 2017 01:18 IST

प्रतिनिधी नेमणूक : कार्यकर्त्यांकडे मतदारांच्या व्यवस्थेची जबाबदारी

नाशिक : महापालिका निवडणुकीच्या मतदानासाठी अवघे काही तास शिल्लक असताना उमेदवार व त्यांच्या समर्थकांकडून मंगळवारच्या मतदानाची तयारी केली जात असून, मतदान केंद्रांवर मतदान प्रतिनिधी, बूथ प्रतिनिधींची नेमणूक करण्याबरोबरच मतदारांची ने-आण तसेच पडद्यामागची कामे करण्यासाठी कार्यकर्त्यांची नेमणूक करण्यावरच सोमवारी भर देण्यात आला. महापालिका निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वीपासूनच निवडणुकीला सामोरे जाण्याच्या तयारीत गुंतलेल्या उमेदवारांसाठी आता केवळ काही तासच हाती शिल्लक राहिले आहेत. गेल्या महिनाभरापासून उमेदवार पक्षाची उमेदवारी, नामांकन अर्ज, त्याची तयारी, प्रत्यक्ष नामांकन, कार्यकर्त्यांची जुळवाजुळव, मतदार यादीचा अभ्यास, प्रचाराचे नियोजन, मतदारांच्या गाठीभेटी आदि कामांमध्ये दंग होते. रविवारी सायंकाळी निवडणुकीचा जाहीर प्रचार संपुष्टात आल्यानंतर आता उमेदवारांना प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशीची तयारी महत्त्वाची असल्याने त्यादृष्टीने कामे केली जात आहे. सोमवारचा संपूर्ण दिवस मतदान प्रतिनिधी, बूथ प्रतिनिधींची नेमणूक करण्यासाठी कार्यकर्त्यांची निवड करण्यात आली. ज्यांना मतदान प्रतिनिधी नेमण्यात येणार त्यांच्याकडून प्रभागातील मतदार यादीचा अभ्यास करवून घेण्याबरोबरच संशयास्पद मतदारांवर लक्ष ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या, तर बूथ प्रतिनिधींना संगणकावर मतदारांची नावे शोधणे, त्यासाठी लॅपटॉपची सोय, मतदान केंद्राबाहेर बूथची जागा निश्चित करणे, मतदार चिठ्ठ्यांचे वाटप करणे या कामांचे नियोजन करण्यात आले. मंगळवारी सकाळी सात वाजेपासूनच समर्थक, कार्यकर्त्यांना सक्रिय राहण्याचे ठरविण्यात आले. मतदान केंद्रावर नेमण्यात येणाऱ्या प्रतिनिधींच्या चहा-पाण्याची सोय, सकाळच्या वेळेत मतदारांना मतदानासाठी घराबाहेर काढणे, मतदारांची ने-आण करण्यासाठी वाहनांच्या व्यवस्थेवर अंतिम हात फिरविण्यात आला. (प्रतिनिधी)