सीईओंनी केले ओळखपत्रांचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2021 01:22 IST2021-01-30T01:21:51+5:302021-01-30T01:22:35+5:30
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी महादेवपूर येथील जिल्हा परिषदेच्या शाळेला भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधत ओळखपत्रांचे वाटप केले.

महादेवपुर येथील शाळेमध्ये विद्यार्थ्यांना ओळखपत्राचे वाटप करताना जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी लिना बनसोड.
नाशिक : जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी महादेवपूर येथील जिल्हा परिषदेच्या शाळेला भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधत ओळखपत्रांचे वाटप केले.
शासनाने इयत्ता पाचवी ते आठवीपर्यंतच्या शाळा सुरू करण्याचे आदेश दिल्याने शाळांची पाहणी बनसोड यांनी केली.
महादेवपूर येथील शाळेला भेट देऊन कोरोना पार्श्वभूमीवर शाळात व वर्गात केल्या जात असलेल्या उपाययोजनांची खात्री केली व महादेवपूर शाळेतील उपाययोजना पाहून समाधान व्यक्त केले. यावेळी उपमुख्य कार्यकारी इशाधीन
शेळकंदे, गट विकास अधिकारी डॉ. सारिका बारी, विनोद मेढे, बी.पी.
ठाकरे, विलास साळी, केंद्रप्रमुख जयंत जाधव, मुख्याध्यापक आव्हाड,
लहांगे, येवला, सूर्यवंशी आदी उपस्थित होते.