होमिओपॅथी औषधांचे केपानगरला वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2020 15:19 IST2020-06-27T15:18:12+5:302020-06-27T15:19:15+5:30
सिन्नर : कोरोना विषाणूच्या संसर्गापासून प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून तालुक्यातील केपानगर येथील कुटुंबाना आर्सेनिक अल्बम 30 या होमिओपॅथीक औषधांचे वाटप करण्यात आले.

सिन्नर तालुक्यातील केपानगर येथे ग्रामस्थांना अर्सेनिक अल्बम 30 औषधांचे वाटप करतांना शरद कातकाडे, समाधान गायकवाड, संदीप व्यवहारे, रंगनाथ कातकाडे आदी.
सिन्नर : कोरोना विषाणूच्या संसर्गापासून प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून तालुक्यातील केपानगर येथील कुटुंबाना आर्सेनिक अल्बम 30 या होमिओपॅथीक औषधांचे वाटप करण्यात आले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, सामाजिक कार्यकर्ते शरद कातकाडे, संदीप व्यवहारे यांच्या सहकार्याने सदरचा उपक्रम राबविण्यात आला.
पंधराशे लोकवस्ती असलेल्या गावांमध्ये प्रत्येक व्यक्तीला चार गोळ्या याप्रमाणे तीन दिवसांच्या याप्रमाणे गोळ्या वाटप करण्यात आलेले आहे. या कार्यक्रमाप्रसंगी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तालुका अध्यक्ष समाधान गायकवाड, केपानगर चे सरपंच रंगनाथ कातकडे, पोलीस पाटील भीमाआव्हाड, चेअरमन देविदास कातकाडे, दिलीप कातकडे, किशोर कातकडे, अनिल कातकडे, अधिक घुगे, माजी सरपंच संदीप कातकडे, संजय कातकाडे, नारायण बोडके, विश्वास आव्हाड, सोपान आव्हाड, खंडेराव कातकाडे, दशरथ कातकडे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.