आदिवासींना धान्य, किराणाचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 00:19 IST2021-05-22T20:08:01+5:302021-05-23T00:19:23+5:30
येवला : तालुक्यातील नागडे येथे भाजपा ओबोसी मोर्चाच्या वतीने आदिवासी कष्टकरी वर्गाला धान्य व किराणा साहित्याचे वाटप खासदार डॉ. भारती पवार यांच्या हस्ते करण्यात आले.

आदिवासींना धान्य, किराणाचे वाटप
येवला : तालुक्यातील नागडे येथे भाजपा ओबोसी मोर्चाच्या वतीने आदिवासी कष्टकरी वर्गाला धान्य व किराणा साहित्याचे वाटप खासदार डॉ. भारती पवार यांच्या हस्ते करण्यात आले.
कोरोना संसर्गाच्या पाश्वभूमीवर लॉक डाऊन सुरू असल्याने नागडे भागातील आदिवासी कष्टकरी वर्ग हाताला काम नसल्याने अडचणीत सापडला आहे. या समाज बांधवाना मदत म्हणून भाजपा ओबीसी मोर्चा नासिक जिल्हा सरचिटणीस राजुसिंग परदेशी यांनी सदर उपक्रम राबविला.
यावेळी ॲड. माणिक शिंदे, दक्षंदा सोनवणे, प्रदेश शंकर वाघ,संजय शेवाळे, सचिन दराडे, संपत नागरे, संजय सानप, प्रमोद सस्कर, तरंग गुजराथी, मयुर मेघराज, केदारनाथ वेळनकर, प्रगती साताळकर, बाळासाहेब साताळकर, कृष्णा कव्हात आदी उपस्थित होते.