शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
2
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
3
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
4
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
5
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
6
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
7
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
8
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
9
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
10
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
11
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
12
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
13
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
14
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
15
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
16
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
17
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
18
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
19
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
20
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
Daily Top 2Weekly Top 5

 दहा हजार शेतकऱ्यांना ३३२ कोटी रुपयांचे पीक कर्ज वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2020 18:01 IST

जिल्ह्यात आतापर्यंत दहा हजार शेतकऱ्यांना ३३२ कोटी पर्यंतचे पीक कर्ज वाटप करण्यात आले असून वितरण प्रक्रियेतील दोष दूर करून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप केले जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी यांनी दिली.

ठळक मुद्देजिल्हाधिकारी कार्यालयात पीक कर्ज वाटपासंदर्भात बैठकजिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक कर्जाचे वाटप सुरू आतापर्यंत दहा हजार शेतकऱ्यांना ३३२ कोटी रुपयांचे वाटप

नाशिक : पीक कर्ज वाटपाचा वेग वाढविण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून प्रयत्न सुरू असून आतापर्यंत दहा हजार शेतकऱ्यांना ३३२ कोटी पर्यंतचे पीक कर्ज वाटप करण्यात आले असून वितरण प्रक्रियेतील दोष दूर करून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप केले जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी यांनी दिली.जिल्हाधिकारी कार्यालयात पीक कर्ज वाटपासंदर्भात साप्ताहिक बैठकीत ते  होते. बँक ऑफ महाराष्ट्रचे झोनल मॅनेजर बाळासाहेब टावरे, लीड बँकेचे व्यस्थापक अर्धंदू शेखर, जिल्हा उपनिबंधक गौतम बलसाने व अन्य बँकांचेप्रतिनिधीही या बैठकीला उपस्थित होते. वितरण प्रक्रियेतील सर्व अडचणी दूर करून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना कर्जवाटप करण्याचा प्रयत्न जिल्हा प्रशासन, जिल्हा अग्रणी बँक तसेच जिल्हा उपनिबंधक यांच्याकडून करण्यात येत असल्याचे यावेळ सुरज मांढरे यांनी सांगितले.  तसेच महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेव्यतिरक्त ज्या शेतकऱ्यांकडे कर्जाची थोडीफार थकबाकी असेल तर त्यांनी तातडीने ती जमा केली, तर ते शेतकरी नवे कर्ज मिळविण्यासाठी पात्र ठरतील. त्यामुळे अशा शेतकऱ्यांनी बँकेचे तातडीने संपर्क करून पूर्तता करावी असे आवाहनही त्यांनी केले आहे. पीक कर्ज वाटप करताना बँकांना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी प्रत्येक आठवड्यातील बैठकीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पीक कर्ज लवकर मिळावे याबाबत नियोजन करण्यात येत आहे. बँकांना येणाऱ्या अडचणींचेही तत्काळ निरसन केले जात आहे. तसेच प्रत्येक पंधरा दिवसांनी सर्व बँकांच्या नोडल अधिकाऱ्यांना क्षेत्रीय स्तरावर कर्जवाटपाचे काम वाढविण्याबाबतच्या सूचना देवून त्याचा पाठपुरावा देखील करण्यात येत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पीक कर्ज वाटप करतांना बँकांनी अधिकाधीक डिजिटल पद्धतीचा वापर करावा, जेणेकरून शेतकऱ्यांचा त्रास कमी होईल व त्यांना वेळेत पीक कर्ज मिळेल. तसेच शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावरील बोजा नोंदणीसाठी ऑनलाइन पद्धतीचा वापर करण्याच्या सूचना तलाठ्यांना देण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कर्ज वाटप करणाऱ्या बँकांनी बल्क एसएमसद्वारे शेतकऱ्यांना पीक कर्जाविषयीची माहिती पोहचवून ती माहिती शेतकऱ्यांना मिळाल्याची खात्री देखील करावी, अशा सूचनाही त्यांनी यावेळी केल्या. 

टॅग्स :agricultureशेतीNashikनाशिकCrop Loanपीक कर्जFarmerशेतकरीcollectorजिल्हाधिकारीSuraj Mandhareसुरज मांढरे