कावनईत १५ विद्यार्थिनींना सायकलींचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2020 18:04 IST2020-03-15T18:04:07+5:302020-03-15T18:04:41+5:30
वैतरणानगर : कावनई येथे आदर्श माध्यमिक विद्यालयात जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभागाकडून मानव मिशन अंतर्गत आठवीच्या पंधरा विद्यार्थिंनींना सायकलींचे वाटप करण्यात आले.

कावनईत १५ विद्यार्थिनींना सायकलींचे वाटप
ग्रामीण भागातील विद्यार्थिंनींना एका गावातून दुसऱ्या गावातील शाळेत जाण्यासाठी पायपीट करीत जावे लागत होते. शाळेच्या वेळेत वाहनांची सोय नसलेल्या मुलींना पायपीट करावी लागत होती. यासाठी शासनाने २०१३-१४ पासून मानव विकास मिशनअंतर्गत सुरू करण्यात आलेल्या उपक्रमाच्या माध्यमातून आठवीच्या मुलींना सायकलींचे वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार शासनाकडून जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाला निधी देण्यात येतो. नाशिक जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाला यावर्षी कोटी रूपयांचा निधी प्राप्त झाला आहे. प्रत्येक मुलीला सायकल खरेदी करण्यासाठी त्यांच्या खात्यात ३५०० रूपये जमा केले जातात. यातील काही मुलींच्या खात्यात रक्कम जमा करण्यात आली आहे. उर्वरित मुलींच्या खात्यात रक्कमजमा करण्याचे काम सुरू असल्याचे शिक्षण विभागाच्यावतीने सांगण्यात आले. मानव विकास मिशनअंतर्गत विद्यार्थिंनींना सायकल वाटप केल्यामुळे शाळेत जाण्यासाठी मुलींची पायपीट थांबली आहे. यावेळी सरपंच सुनीता पाटील, मुुख्याध्यापक बाळासाहेब गांगुर्डे, किरण रायकर, ग्रामपंचायत सदस्य निवृत्ती शिरसाट, गोपाळ पाटील, एस. आर. भामरे आदी शिक्षक व लाभार्थी उपस्थित होते.