Distressed husbands shave off donations | रामकुंडावर अभिनव आंदोलन : नात्याचे दान करत त्रस्त पतींनी केले मुंडन
रामकुंडावर अभिनव आंदोलन : नात्याचे दान करत त्रस्त पतींनी केले मुंडन

ठळक मुद्देनाते केले स्वाह...!नातेदान हाच एकमेव पर्याय मानून हवन कार्यकर्त्यांनी चक्क रामकुंडावर येत मुंडन केले

नाशिक : कौटुंबिक हिंसाचारविरोधी कायदे एकतर्फी असून महिलांच्या सुरक्षिततेसाठी करण्यात आलेल्या कायद्यात पुरूष हक्कांचा विचार होणे गरजेचे आहे, जेणेकरून महिलांकडून त्या कायद्यांचा गैरवापर करणे थांबेल अशी मागणी करत वास्तव फाउण्डेशन मुंबईच्य संस्थेच्या कार्यकर्त्यांनी चक्क रामकुंडावर येत मुंडन केले अन् हवनमध्ये नात्याचे दान क रत रविवारी (दि.२२) अभिनव आंदोलनाने लक्ष वेधून घेतले.
वास्तव फ ाउण्डेशन पुरूषांच्या न्यायहक्कांसाठी लढणारी संस्था आहे. पुरूषांवर दाखल महिलांकडून दाखल होणारे खोटे गुन्हे मागे घेण्यासाठी या संस्थेचे पदाधिकारी प्रयत्न करतात. समाजात महिलांवर अन्याय अत्याचार होतो ही बाब खरी जरी असली तरी पुरूषांवर होणाऱ्या अन्यायअत्याचाराकडे मात्र कोणाचेही लक्ष जात नाही. विवाह केल्यानंतर घटस्फोट देऊन महिलांकडून नात्यांवर पाणी सोडले जाते. घटस्फोटाला कुठेही थारा नसून कौटुंबिक हिंसाचाराचा यासाठी आधार घेतला जातो, हे चुकीचे असल्याचे यावेळी पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
कोणतीही चूक नसताना, केवळ मनाविरु द्ध विवाह केलेल्या पत्नींकडून खोटे गुन्हे दाखल केल्याने नाहक मानिसक त्रासासह अनेकांना तुरु ंगवासही भोगावा लागला आहे. अशा त्रस्त पतींनी सुमारे शंभरपेक्षा अधिक पतींनी या आंदोलनात सहभाग घेतला. कायद्याने नव्हे तर धार्मिक परंपरा अन्य रितीरिवाजानुसारच पत्नीपासून सुटका मिळावी, अत्याचारी पत्नींविरोधात पुरु ष हक्कांच्या संरक्षणाच्या घोषणा यावेळी आंदोलकांनी दिल्या. यावेळी वास्तव फांऊडेशनचे अमित देशपांडे, पुरुष हक्क संरक्षण समितीचे अ‍ॅड. धर्मेंद्र चव्हाण उपस्थित होते.

नाते केले स्वाह...!
महिला संरक्षण कायद्याचा गैरवापर केला जातो. परिणामी पतींसह त्यांचे कुटूंबियांची मानिसक, सामाजिक, आर्थिक प्रतिष्ठा पणाला लागते. तर दुसरीकडे न्यायालयाने घटस्फोट दिला तरी पतींच्या मनातील पत्नीविषयीची भावना जात नाही. कारण नसताना त्यांना त्रास सहन करावा लागतो. तसेच, हिंदू धार्मिक परंपरेमध्ये घटस्फोटाला मान्यता नाही. त्यामुळे त्यावर नातेदान हाच एकमेव पर्याय मानून हवन करत नात्या स्वाह... केले.

 

 

Web Title: Distressed husbands shave off donations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.