सोशल मीडियावर आॅडीओ क्लिप टाकून प्रतिष्ठित कुटुंबाची बदनामी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2018 17:27 IST2018-08-19T17:27:27+5:302018-08-19T17:27:49+5:30
सोशल मीडियावर गावातील प्रतिष्ठित कुटुंबातील सदस्यांविषयी आॅडीओ क्लिप टाकून बदनामी केल्याप्रकरणी पिळकोस ग्रामपंचायत सदस्यांसह शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाच्या पदाधिकाऱ्यांविरुद्ध शनिवारी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सोशल मीडियावर आॅडीओ क्लिप टाकून प्रतिष्ठित कुटुंबाची बदनामी
पिळकोस : सोशल मीडियावर गावातील प्रतिष्ठित कुटुंबातील सदस्यांविषयी आॅडीओ क्लिप टाकून बदनामी केल्याप्रकरणी पिळकोस ग्रामपंचायत सदस्यांसह शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाच्या पदाधिकाऱ्यांविरुद्ध शनिवारी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कळवण तालुक्यातील पिळकोस येथील विद्यमान ग्रामपंचायत सदस्य राकेश शिवाजी वाघ व पिळकोस येथील कळवण तालुका शिवसेनेचे ग्राहक संरक्षक कक्ष उपाध्यक्ष उत्तम बारकू मोरे यांनी गावातील एका प्रतिष्ठित कुटुंबातील सदस्यांविषयी बदनामीकारक व आक्षेपहार्य चर्चा केली. त्यांच्यात झालेल्या संभाषणाची आॅडीओ क्लिप मोबाइलवर तयार करून गावातील व्हॉट्सअॅप ग्रुपवर व्हायरल करून संबंधित कुटुंबाची बदनामी केली. या कुटुंबातील व्यक्तीने वाघ व मोरे यांच्याविरोधात कळवण पोलिसात तक्र ार दाखल केली असून, पोलिसांनी विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, वाघ व मोरे आपले मोबाइल बंद करून फरार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. पुढील तपास कळवणचे पोलीस निरीक्षक सुधाकर मांडवकर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार जगन पवार करत आहेत. मोबाइलवर बदनामीकारक क्लिप टाकल्यामुळे पिळकोस गावात तणावाचे वातावरण असून, ग्रामस्थांनी या घटनेची निंदा करत संताप व्यक्त केला आहे. याबाबतीत संबंधितांवर कडक कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी पोलीस निरीक्षक सुधाकर मांडवर यांच्याकडे केली आहे.