जि. प. अध्यक्षांनी साधला विद्यार्थ्यांशी संवाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2021 00:03 IST2021-01-04T20:05:11+5:302021-01-05T00:03:25+5:30

निफाड : जिल्ह्यात नववी ते बारावीचे वर्ग सुरू झाल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांनी निफाड वैनतेय विद्यालयास भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

Dist. W. The President interacted with the students | जि. प. अध्यक्षांनी साधला विद्यार्थ्यांशी संवाद

जि. प. अध्यक्षांनी साधला विद्यार्थ्यांशी संवाद

दहावीच्या वर्गास भेट दिल्यानंतर क्षीरसागर यांनी, शाळा सुरू झाली आहे, आपल्याला काय वाटते? असा प्रश्न विद्यार्थ्यांना विचारला. त्यावर आम्हाला आज आनंद वाटतो आहे असे उत्तर विद्यार्थ्यांनी दिले. वैनतेय विद्यालयाने विद्यार्थ्यांसाठी केलेली बैठक व्यवस्था ,सॅनिटायझर , थर्मल स्कॅनिंग याबाबत केलेले नियोजन बघून क्षीरसागर यांनी समाधान व्यक्त केले. त्यानंतर वैनतेय ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्सच्या विद्यार्थ्यांसमोर आयोजित कार्यक्रमात व्यासपीठावर गटशिक्षणाधिकारी केशव तुंगार, न्या. रानडे विद्या प्रसारक मंडळाचे विश्वस्त वि. दा. व्यवहारे, राजेंद्र राठी , प्राचार्य डी. बी. वाघ, उपप्राचार्य एस.पी.गोरवे, पर्यवेक्षक बी. आर. सोनवणे आदी मान्यवर होते. प्रास्तविक प्रा. एम.एस.माळी यांनी केले.

Web Title: Dist. W. The President interacted with the students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.