शहरं
Join us  
Trending Stories
1
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
2
कैसे बोगस दाखला बनाया? एमआयएम नगरसेविका सहर शेखकडून शासकीय यंत्रणांची दिशाभूल
3
नाशिकच्या तरुणींना मलेशियात विकण्याचा कट? आयटी कंपनीतील 'त्या' प्रकरणाला मानवी तस्करीचे भयानक वळण
4
Mumbai Traffic Update: बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
5
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
6
IPL 2026: आधीच KKRची एक सामना जिंकायची मारामार, त्यात अजिंक्य रहाणेला BCCIचा मोठा दणका
7
सुपर डुपर हिट... ‘वंदे भारत’ची कमाल कामगिरी, ९ कोटी प्रवाशांचा प्रवास; २७४ जिल्हे, १६४ सेवा!
8
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
9
Share Market: शेअर बाजारात तुफान तेजी! सेंसेक्समध्ये १२०० अंकांची उसळी; निफ्टी २४,२०० च्या वर; 'या' शेअर्समध्ये जोरदार रॅली
10
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
11
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
12
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
13
भन्साळींच्या 'रोमँटिक' प्रोजेक्टसाठी शाहरुखचा 'ग्रीन सिग्नल'? वयानुसार भूमिका करणार किंग खान
14
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
15
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
16
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
17
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
18
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
19
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
20
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
Daily Top 2Weekly Top 5

जागेच्या वादातून भारतनगरमध्ये दंगल

By admin | Updated: January 4, 2016 00:20 IST

दगडफेक : गोळीबार झाल्याचा नागरिकांचा आरोप; अनैतिक व्यवसायातील अकरा महिला पोलिसांच्या ताब्यात

नाशिक : जागेच्या वादातून भारतनगर शेजारील नंदिनीनगरमधील काही झोपड्या दहशत निर्माण करून जेसीबीच्या साहाय्याने पाडण्याच्या घटनेस दोन दिवस उलटत नाही तोच रविवारी (दि़३) दुपारी पुन्हा उर्वरित झोपड्या पाडण्यासाठी आलेले सुमारे दीडशे संशयित व झोपडपट्टीवासीय यांच्यामध्ये दंगल होऊन दगडफेकीची घटना घडली़ यामध्ये संशयितांनी धमकावण्यासाठी गोळीबार केल्याचा आरोप झोपडपट्टीवासीयांनी केला असून, पोलिसांनी मात्र इन्कार केला आहे़ दरम्यान, पोलिसांनी अनैतिक व्यवसायातील अकरा महिलांना ताब्यात घेतले आहे़ या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते़३१ डिसेंबर व १ जानेवारीला दुपारच्या सुमारास नंदिनीनगरमधील सुमारे २० ते २५ घरे संशयित आकाश साबळे, फुल्याबाई ऊर्फ आक्का व त्यांच्या आठ ते दहा साथीदारांनी धमकावून, दहशतीने जेसीबीच्या साहाय्याने तोडल्याची घटना घडली होती़ या प्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात या संशयितांवर गुन्हाही दाखल आहे़ रविवारी(दि़३) सकाळी या झोपड्यांतील रहिवाशांनी मुंबई नाका पोलीस ठाण्यात जाऊन तोडलेल्या ठिकाणी पुन्हा झोपड्या उभारण्याची परवानगी मागितली़ वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाजीराव महाजन यांनी झोपडपट्टीवासीयांकडून जागेच्या कागदपत्रांशिवाय परवानगी देता येत नसल्याचे सांगितल्याने झोपडपट्टीधारक पुन्हा नंदिनीनगरमध्ये आले़ यानंतर दुपारच्या सुमारास संशयित आकाश साबळे, फुल्याबाई ऊर्फ आक्का हे सुमारे दीडशे संशयितांसह तिथे आले व त्यांनी उर्वरित झोपड्या खाली करण्यासाठी दमदाटी केली़ यामुळे संतप्त झोपडपट्टीवासीय व संशयितांमध्ये वाद होऊन दंगल झाली़ यामध्ये तुफान दगडफेकही होऊन काही तरुण व महिला जखमी झाल्या आहेत़नंदिनीनगरमधील झोपडपट्टी-वासीयांनी केलेल्या दगडफेकीत शर्मा यांच्या ‘मरियम निवास’ या इमारतीच्या काचा फोडण्यात आल्या तर या ठिकाणाहून अनैतिक व्यवसाय करणाऱ्या अकरा महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतले़ याबरोबरच थोड्या अंतरावरील अनैतिक व्यवसायाचे केंद्र असलेल्या एका घराच्या बाहेरील पत्रेही जमावाने तोडले़ गत चाळीस वर्षांपासून या ठिकाणी अनैतिक व्यवसाय सुरू असून याकडे पोलीस जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याची तक्रार रहिवाशांनी पोलीस आयुक्त एस़जगन्नाथन यांच्याकडे केली़