चालकाकडून विद्यार्थिनीचा विनयभंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2019 01:23 AM2019-08-31T01:23:02+5:302019-08-31T01:23:35+5:30

शहरातील एका शालेय विद्यार्थिनीचा स्कूलबसमधून उतरताना बसचालकाने विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या घटनेप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला

 Disrespect of Student by Driver | चालकाकडून विद्यार्थिनीचा विनयभंग

चालकाकडून विद्यार्थिनीचा विनयभंग

Next

नाशिक : शहरातील एका शालेय विद्यार्थिनीचा स्कूलबसमधून उतरताना बसचालकाने विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या घटनेप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, स्कूल बसचालकाला पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान, स्कूल बसचालक कंत्राटी असल्याचे सांगत स्कूल प्रशासनाने मात्र या घटनेपासून हात झटकण्याचा प्रयत्न केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मखमलाबादच्या एरिगेशान कॉलनीतील राहणार गोरखनाथ मोतीलाल आहेर (४९) असे संशयित आरोपीचे नाव आहे. त्याने केलेल्या घृणास्पद कृत्याविषयी विद्यार्थीनीच्या पालकांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार त्यांची मुलगी शहरातील एका
खासगी शाळेत स्कूल व्हॅनमधून ये-जा करते.
बुधवारी सांयकाळी पीडित बालिकेला घरी सोडताना संशयिताने तिला पुढे बोलावून घेतले. तसेच ती बसमधून खाली उतरत असताना तिचा विनयभंग केला. घाबरलेल्या विद्यार्थिनीने ही घटना घरी आल्यानंतर पालकांना सांगितली. पालकांनी लागलीच सरकारवाडा पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली असून, पोलिसांनी पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करीत संशयित आरोपीस अटक केली आहे. महिला पोलीस उपनिरीक्षक पिंपरे
या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहे.

Web Title:  Disrespect of Student by Driver

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.