नाशिकमधील जगताप मळ्यात पोलिसांना धक्काबुकी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2023 18:23 IST2023-03-20T18:22:40+5:302023-03-20T18:23:37+5:30
भंडारी व आढाव यांनी क्रिरांश कौशिक याला ताब्यात घेऊन पोलिस गाडीतून उपनगर पोलीस ठाण्यासमोरील गुन्हे शाखा कार्यालयात आणले.

नाशिकमधील जगताप मळ्यात पोलिसांना धक्काबुकी
मनोज मालपाणी
नाशिकरोड - बिटको महाविद्यालय मागील जगताप मळा येथे घरात शिवीगाळ करून तोडफोड करणाऱ्याची तक्रार आल्यानंतर घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांसोबतही हुज्जत घालून शिवीगाळ करीत गाडीचा आरसा फोडून शासकीय कामात अडथळा आणाऱ्या संशयित क्रिरांश कोशिक याला पोलिसांनी अटक केली आहे.
उपनगर पोलीस ठाण्यातील पोलिस कर्मचारी दिनेशकुमार बद्री भंडारी रविवारी सकाळी कर्तव्यावर असताना ११२ क्रमांकावर देवी तांती यांचा पोलिस मदतीसाठी फोन आला. तांती यांच्या घरात क्रिरांश क्रिष्णा कौशिक (४०, रा. इलाहाबाद उत्तरप्रदेश) शिवीगाळ करून घरात तोडफोड करीत असल्याचमी माहिती मिळालेल्याने पोलिस कर्मचारी भंडारी हे गृहरक्षक दलाचा जवान संतोष आढाव याला सोबत घेऊन पोलिस गाडीने तातडीने जगताप मळा श्री शनी मंदिरामागील नारायण दीप इमारतीत गेले. यावेळी क्रिरांश हा पोलिसांना बघून शिवीगाळ करीत भंडारी यांना धक्काबुक्की करून हाताच्या चापटीने मारहाण केली.
भंडारी व आढाव यांनी क्रिरांश कौशिक याला ताब्यात घेऊन पोलिस गाडीतून उपनगर पोलीस ठाण्यासमोरील गुन्हे शाखा कार्यालयात आणले. गाडीतून उतरल्यानंतर क्रिरांश याने पुन्हा पोलिसांना शिवीगाळ करीत गुन्हेशोध पथकाच्या (एम एच १२ एबी १६२ ) गाडीचा बाजूचा आरसा तोडून टाकत गाडीवर डोके आपटण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात शासकीय कामात अडथळा आणण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.