शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
2
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
3
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
4
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
5
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
6
साताऱ्यात वातावरण तापणार; शनिवार-रविवारची सुटी हेरून गुन्हा दाखल केल्याची एपीएमसीत चर्चा
7
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
8
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
9
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
10
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
11
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
12
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
13
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
14
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
15
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
16
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
17
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
18
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
19
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
20
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...

घरफोडीतून खुनाचा उलगडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2019 1:02 AM

गुन्हेगाराला जामीन राहिला आणि त्यानंतर ओळखीचे रूपांतर नातेसंबंधात झाले. गुन्हेगाराच्या आईला बहीण मानलेल्या संजय पंडित शेवाळे या उच्चशिक्षित तरुणाचा त्याच गुन्हेगाराने हत्येचा कट रचून ठार मारल्याची घटना २५ दिवसांपूर्वी निफाड पोलीस ठाणे हद्दीत घडली. शहर गुन्हे शाखा युनिट- १चे पथक घरफोडीचा तपास करत असताना संशयित गुन्हेगारांना पथकाने चुंचाळेत ताब्यात घेतले.

ठळक मुद्दे२५ दिवसांपूर्वी प्राध्यापकाचा खून उगाव-शिवडी रस्त्यावर पेट्रोलने जाळला मृतदेह

नाशिक : गुन्हेगाराला जामीन राहिला आणि त्यानंतर ओळखीचे रूपांतर नातेसंबंधात झाले. गुन्हेगाराच्या आईला बहीण मानलेल्या संजय पंडित शेवाळे या उच्चशिक्षित तरुणाचा त्याच गुन्हेगाराने हत्येचा कट रचून ठार मारल्याची घटना २५ दिवसांपूर्वी निफाड पोलीस ठाणे हद्दीत घडली. शहर गुन्हे शाखा युनिट- १चे पथक घरफोडीचा तपास करत असताना संशयित गुन्हेगारांना पथकाने चुंचाळेत ताब्यात घेतले. दरम्यान, गुन्हेगारांची कसून चौकशी केली असता पोलिसांना निफाड येथील प्राध्यापक शेवाळे यांच्या खुनाचे धागेदोरे मिळाले आणि पेट्रोलने जाळून टाकलेल्या शेवाळेंच्या मृतदेहाचे रहस्य समोर आले.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पोलीस आयुक्तालय हद्दीत वाढत्या घरफोडीच्या घटनांना आळा घालण्यासाठी शहर गुन्हे शाखा युनिट- १च्या पथकाला विविध गुन्ह्णांचा समांतर तपास करण्याचे आदेश देण्यात आले होते. आडगाव पोलीस ठाणे हद्दीत घडलेल्या घरफोडीच्या तपासात संशयित चुंचाळे शिवारात येणार असल्याची गुप्त माहिती पथकाला मिळाली. त्यानुसार पोलीस निरीक्षक आनंदा वाघ, महेश कुलकर्णी, उपनिरीक्षक बलराम पालकर यांच्यासह पथकाने सापळा रचला. यावेळी संशयित नीलेश उत्तम वायाळ (रा. चुंचाळे), सुरज केशव कांबळे (कुंदे गल्ली, निफाड) या दोघांना मंगळवारी (दि. ११) ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केली असता एका अल्पवयीन साथीदाराच्या मदतीने घरफोडी केल्याची कबुली दिली. दरम्यान, फरार अल्पवयीन साथीदार मुंबई, पनवेल, ठाणे अशी विविध शहरे बदलत होता. नवी मुंबई पोलिसांच्या मदतीने सदर अल्पवयीन गुन्हेगाराच्या मुसक्या आवळण्यात आल्या.अल्पवयीन गुन्हेगाराकडून फुटले बिंगपोलिसांनी अल्पवयीन गुन्हेगाराची कसून चौकशी केली असता त्याने धक्कादायक संशयास्पद बाबींचा उलगडा केला. पथकाने तत्काळ त्यास सोबत घेऊन तपासाची चक्रे गतिमान केली. २५ दिवसांपूर्वी १८ मे रोजी उगाव-शिवडी रस्त्यावर निफाड येथील संशयित सौरभ राजू ढगे व त्याचा लहान भाऊ (अल्पवयीन), सागर राहुल जाधव (रा. कसबे सुकेणा), नीलेश वायाळ यांच्यासोबत मिळून संगनमनाते सदर अल्पवयीन गुन्हेगाराने सौरभचा मानलेला मामा शेवाळेचा कोयत्याने वार करून खून केल्याची कबुली दिली. खुनाचा उलगडा होऊ नये म्हणून थंड डोक्याने या गुन्ह्याचा मास्टरमाइंड १६ घरफोड्या करणारा सराईत गुन्हेगार सौरभ याने शेवाळेंचा मृतदेह साथीदारांच्या मदतीने पेट्रोलने पेटवून पुरावा नष्ट केला.आईला शिवीगाळ केल्याचा रागशेवाळे याची सराईत गुन्हेगार सौरभशी ओळख व मैत्री झाल्यानंतर त्याच्या निफाड येथील घरी त्याचे ये-जा वाढली. त्याच्या आईला शेवाळे याने बहीण मानले. सौरभ व त्याचा अल्पवयीन भाऊ हे दोघे शहरात येऊन घरफोड्या करत लुटलेले सोने मानलेला मामा शेवाळेला नेऊन देत होते; मात्र शेवाळे त्यामाध्यमातून पैसे मिळवून दारू पिऊन घरात आल्यावर मानलेल्या बहिणीशी वाद घालत शिवीगाळ करत होता. त्याचा राग मनात धरून सौरभने मानलेल्या मामाचा काटा काढण्याचा कट रचल्याचे पोलीस तपासात पुढे आले आहे.मृतदेहाची हाडे वाहिली नदीतशेवाळेला उगाव शिवडी रस्त्यावरील एका खोलीत कोयत्याने ठार मारल्यानंतर संशयित सौरभ याने साथीदार नीलेश वायाळ, सागर जाधव व एक अल्पवयीन गुन्हेगाराच्या मदतीने मृतदेह चक्क डिओसारख्या मोपेड दुचाकीवरून पंपिंगस्टेशन निफाडच्या परिसरातील जांभूळ बागेत नेला. तेथील एका कडुनिंबाच्या झाडाखाली शेवाळेचा मृतदेह पेट्रोल, टायर टाकून पेटवून दिला. मृतदेहाची राख झाल्यानंतर शरीराची सर्व मोठी हाडे संशयितांनी एकत्रित क रून नदीत फेकून दिल्याचे पोलिसांनी सांगितले.पालकर यांच्या फिर्यादीवरून संशयित गुन्हेगारांविरुद्ध निफाड पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयCrime Newsगुन्हेगारी