महाविद्यालयाजवळ बस थांबत नसल्याने गैरसोय
By Admin | Updated: January 22, 2016 22:37 IST2016-01-22T22:35:22+5:302016-01-22T22:37:29+5:30
महाविद्यालयाजवळ बस थांबत नसल्याने गैरसोय

महाविद्यालयाजवळ बस थांबत नसल्याने गैरसोय
कळवण : मानूर येथील कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाजवळील बसथांब्यावर बस थांबत नसल्याची तक्रार विद्यार्थ्यांनी कळवण आगारप्रमुख अहेर यांची भेट घेऊन निवेदनाद्वारे केली आहे.
मानूर येथील महाविद्यालयात ५०० पेक्षा जास्त विद्यार्थी शिक्षण घेत असून, कला व वाणिज्य शाखेची वेळ सकाळी ८ ते ११.१५ अशी असून, विज्ञान शाखेची वेळ सकाळी ११ ते ४.१५ अशी आहे. कळवण व इतर आगाराच्या बसेस विद्यार्थ्यांना घेत नाहीत त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.
बसवाहक अरेरावीची भाषा करत असल्याची तक्रार विद्यार्थ्यांनी केली आहे. नाशिक रस्त्याने जाणाऱ्या व येणाऱ्या बसेस महाविद्यालयाच्या जवळ थांबविण्यात याव्यात, अशी मागणी आगारप्रमुखांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे. यावेळी प्रवीण पगार, सचिन बोरसे, भूषण शिंदे, किरण जाधव, भरत शिरसाठ, समाधान शिरसाठ आदि विद्यार्थी उपस्थित होते.