शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

बोटक्लबवर होणार डोहाळे जेवण

By admin | Updated: March 3, 2017 01:51 IST

नाशिक : बोटक्लबकडे शासन व्यवस्थेचे झालेले दुर्लक्ष पाहता,दुरुस्तीसाठी आर्थिक हातभार लावण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने बोटक्लब सार्वजनिक समारंभासाठी खुले करण्याचा निर्णय घेतला आहे.

नाशिक : आघाडी सरकारच्या काळात कोट्यवधी रुपये खर्च करून गंगापूर धरणालगत उभारण्यात येणाऱ्या बोटक्लबकडे राज्यातील सत्तांतरानंतर शासन व्यवस्थेचे झालेले दुर्लक्ष पाहता, सद्यस्थितीत बोटक्लबवर उभारण्यात आलेल्या सुविधांकडे पर्यटकांना आकर्षित करण्याबरोबरच तेथील व्यवस्थेची देखभाल, दुरुस्तीसाठी आर्थिक हातभार लावण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने बोटक्लब सार्वजनिक समारंभासाठी खुले करण्याचा निर्णय घेतला आहे. या नवीन निर्णयामुळे गंगापूर धरणालगतच्या नयनरम्य वातावरणात वाढदिवस साजरा होण्याबरोबरच लग्नसमारंभ, डोहाळे जेवणाच्या पंक्तीही उठणार असून, त्यासाठी मात्र तासावर पैसे मोजावे लागणार आहेत. सध्या गंगापूर धरणावर उभारण्यात येणारे व अर्धवटस्थितीत पडून असलेल्या बोटक्लबची अवस्था बिकट आहे. या ठिकाणी उभारण्यात आलेले प्रदर्शनीय सेंटर अर्धवट असून, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडून उभारण्यात येणाऱ्या रिसॉर्टचे कामही काही कोणत्या तरी निमित्ताने पूर्ण होऊ शकलेले नाही. त्यामुळे पर्यटनवृद्धीसाठी कोट्यवधी रुपये खर्च करूनही पाहिजे त्या प्रमाणात त्याचा उपयोग होत नाही, उलटपक्षी पर्यटन महामंडळाने विकसित केलेले व त्यांच्या ताब्यात असलेल्या वास्तुची देखभाल दुरुस्ती करण्यासाठीच महामंडळाला खर्च करावा लागत आहे. अशा परिस्थितीत या वास्तुचे जतन तर व्हावेच, परंतु नाशिक हे पर्यटकांना आकर्षित करण्यात यशस्वी व्हावे, असा विचार महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी केला आहे. काही वर्षांपूर्वी आघाडीचा अभिनेता सलमान खान याने हजेरी लावलेल्या बोटक्लबला पर्यटकांनी भेट द्यावी यासाठी करावयाच्या प्रयत्नाचा भाग म्हणून आता नाशिककरांसोबतच राज्यातील कानाकोपऱ्यातील कोणत्याही पर्यटकांना समारंभाच्या माध्यमातून बोटक्लबचा आनंद घेता यावा म्हणून वाढदिवस, लग्न समारंभ, डोहाळे जेवण, साखरपुडा अशा आनंद व मांगल्यमय समारंभासाठी भाड्याने देण्याचे ठरविले आहे. सकाळी १० वाजेपासून ते रात्री १० वाजेपर्यंत पर्यटन विकास महामंडळाच्या अटी, शर्तींच्या अधीन राहून भाडेतत्त्वावर बोटक्लबचा वापर व तेथील सोयी, सुविधांचा लाभ नागरिकांना घेता येणार आहे. त्यासाठी चार तासांसाठी पाच हजार रुपये, आठ तासांसाठी सात हजार व पूर्ण दिवसासाठी दहा हजार रुपये दर आकारणी असेल. याशिवाय बोटक्लबची स्वच्छता, वीज वापर व सेवाकरासाठी दोन हजार रुपये अतिरिक्तआकारणी केली जाणार आहे. (प्रतिनिधी)