दिंडोरीच्या सैनिकाचे अरुणाचल प्रदेशात अपघाती निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2022 01:51 IST2022-02-16T01:50:53+5:302022-02-16T01:51:19+5:30

दिंडोरी येथील प्रसाद कैलास क्षीरसागर (२४) या सैन्य दलातील जवानाचे अरुणाचल प्रदेशमध्ये सोमवारी अपघाती निधन झाले. या घटनेने दिंडोरी शहरावर शोककळा पसरली असून, सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. त्यांचे पार्थिव गुरुवारी सकाळी दिंडोरीत येणार असून, शासकीय इतमात अंत्यसंस्कार होणार आहेत.

Dindori soldier dies in accident in Arunachal Pradesh | दिंडोरीच्या सैनिकाचे अरुणाचल प्रदेशात अपघाती निधन

दिंडोरीच्या सैनिकाचे अरुणाचल प्रदेशात अपघाती निधन

दिंडोरी : येथील प्रसाद कैलास क्षीरसागर (२४) या सैन्य दलातील जवानाचे अरुणाचल प्रदेशमध्ये सोमवारी अपघाती निधन झाले. या घटनेने दिंडोरी शहरावर शोककळा पसरली असून, सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. त्यांचे पार्थिव गुरुवारी सकाळी दिंडोरीत येणार असून, शासकीय इतमात अंत्यसंस्कार होणार आहेत.

दिंडोरी येथील प्रसाद कैलास क्षीरसागर हे भारतीय सैन्य दलात अरुणाचल प्रदेशमध्ये सेवा बजावत होते. सोमवारी सकाळी सैन्यदलाच्या कॅम्पमधून सैनिकी ट्रकद्वारे सहकाऱ्यांसोबत सेवेच्या ठिकाणी जात असताना ट्रक दरीत कोसळून त्यात त्यांचा मृत्यू झाल्याचे समजते.

तालुका प्रशासनाने वरिष्ठ पातळीवरून सदर घटनेची माहिती घेतली. दुपारी लष्करी अधिकाऱ्यांनी दिंडोरी येथे तहसीलदार पंकज पवार यांची भेट घेत अंत्यसंस्कार तयारीचा आढावा घेतला असून, गुरुवारी सकाळपर्यंत त्यांचे पार्थिव दिंडोरी शहरात येणार आहे. त्यानंतर शासकीय इतमात सिडफार्म जागेत अंत्यसंस्कार होणार आहेत.

क्षीरसागर यांच्या पश्चात आई, वडील, बहीण व भाऊ असा परिवार असून, संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी त्यांच्यावर होती. जानेवारीत ते सुटीवर आले होते. सुटी संपून ३० जानेवारीला ते दिंडोरीहून अरुणाचल प्रदेशमध्ये रवाना झाले होते.

Web Title: Dindori soldier dies in accident in Arunachal Pradesh