शहरं
Join us  
Trending Stories
1
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींच्या आरोपावर निवडणूक आयोगाचे उत्तर
2
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
3
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
4
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
5
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
6
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
7
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
8
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
9
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
10
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
11
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
12
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
13
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
14
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
15
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान
16
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळायला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
17
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
18
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
19
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
20
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...

मालेगावी व्यापाऱ्यांचे धरणे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2020 23:09 IST

मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य आवारातील भूखंडावर राष्टÑीय कृषी विकास योजनेंतर्गत उभारण्यात येणाºया १ हजार मेट्रीक टन क्षमतेच्या गुदामाला व्यापाऱ्यांनी विरोध दर्शविला आहे. गुरुवार पासून बेमुदत बंद पुकारुन बाजार समितीच्या कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर धरणे आंदोलन करण्यात आले. बंद व आंदोलनामुळे बाजार समितीचे सुमारे दररोजची ९० लाख रुपयांची उलाढाल ठप्प झाली होती.

ठळक मुद्देबाजार समिती : लिलाव बंद; मोकळ्या भूखंडावर गुदाम व गाळे उभारण्यास विरोध

मालेगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य आवारातील भूखंडावर राष्टÑीय कृषी विकास योजनेंतर्गत उभारण्यात येणाºया १ हजार मेट्रीक टन क्षमतेच्या गुदामाला व्यापाऱ्यांनी विरोध दर्शविला आहे. गुरुवार पासून बेमुदत बंद पुकारुन बाजार समितीच्या कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर धरणे आंदोलन करण्यात आले. बंद व आंदोलनामुळे बाजार समितीचे सुमारे दररोजची ९० लाख रुपयांची उलाढाल ठप्प झाली होती.बाजार समितीच्या मोकळ्या भूखंडावर राष्टÑीय कृषी विकास योजनेंतर्गत १ हजार मेट्रिक टन क्षमतेच्या गुदाम उभारणीला पणन विभागाने मंजुरी दिली आहे. सदर गुदाम उभारणीला १ कोटी ९ लाख ५७ हजार रुपये खर्च अपेक्षित आहे. यात बाजार समिती ४७.७८ लाख तर पणन विभाग ५३.२२ लाख अर्थसहाय्य करणार आहे. शेतकºयांना आपला माल या गुदामात ठेवता येणार आहे. त्या मालाच्या सुरक्षतेची हमी बाजार समितीकडे राहणार आहे. या गुदाम उभारणीला भाजीपाला फळफळावळ मार्केट युनियन, व्यापारी असोसिएशनाने विरोध दर्शविला आहे. बाजार समिती आवारात जागेची कमतरता आहे. टरबुज, कैरी व इतर फळांच्या लिलावासाठी जागेचा वापर केला जातो. सदर जागेवर गुदाम उभारल्यास शेतकºयांच्या मालाचा लिलाव करण्यासाठी जागा शिल्लक राहणार नाही.बाजार समितीने व्यापारी गाळे व गुदाम इतरत्र ठिकाणी बांधावेत, अशी मागणी व्यापाºयांनी केली आहे. या मागणीसाठी बेमुदत संप पुकारुन धरणे आंदोलन सुरू करण्यात आले होते.आंदोलनात किशोर सोनवणे, भिका कोतकर, देवीदास वाघ, संजय घोडके, फकीरा शेख, रामदास बोरसे, मापारी गटाचे संचालक वसंत कोर, हिरालाल वाघ, दिलीप अभोणकर, नथू वाघ, कैलास तिसगे, निहालहाजी बागवान, विलास सोनवणे, संजय पाटील, निंबा मोरे, प्रशांत सोनवणे, नितीन सोनवणे, राजूभाई फ्रुटवाले, अन्नु शेठ आदिंसह, भाजीपाला फळफळावण मार्केट युनियन, व्यापारी संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.९० लाखांची उलाढाल ठप्प; आडत दुकाने बंदकृषी उत्पन्न बाजार समितीतील व्यापार गुरुवारी ठप्प झाल्यामुळे सुमारे ९० लाखांची उलाढाल थंडावली होती. बाजार समितीलाही दररोजच्या ८५ हजार रुपये मार्केट शुल्काला मुकावे लागले. गुरूवारी कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात शुकशुकाट पसरला होता. आंदोलनकर्ते व बाजार समिती प्रशासनामध्ये तडजोड झाली नसल्यामुळे आंदोलन सुरूच होते.शेतकºयांचे धान्य व इतर माल विनामूल्य उभारण्यात येणाºया गुदामात ठेवले जाणार आहे. बाजारभाव कमी झाल्यावर शेतकºयांना दीर्घकाळ आपला माल गुदामात ठेवण्याची सोय केली जाणार आहे. शेतकºयाच्या मालाच्या सुरक्षेची हमी बाजार समिती प्रशासनाकडे राहणार आहे. गुदाम उभारणीसाठी शासनाने निधी देखील दिला आहे. शासनाच्या योजनेला व्यापाºयांकडून विनाकारण विरोध केला जात आहे. शेतकरी हिताचा निर्णय घेणे गरजेचे आहे.- सुनील देवरे(उपसभापती कृउबा, मालेगाव)

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रagricultureशेती